चपलांचा हार घालून काढली विधवेची धिंड..

0
428

मिळालेल्या माहितीनुसार चांदवड तालुक्यातील शिवरे या गावी एका कुटुंबातील विवाहितेचा किरकोळ अपघात होऊन तिचा हात फ्रॅक्चर झाला होता.

त्यानंतर तिला देखबलीसाठी तिच्या माहेरी पतीने आणून घातले. पत्नी माहेरी असतानाच पतीचे दहा दिवसांपूर्वी निधन झालं. माझे पती आत्महत्या करणार नाहीत त्यामागे घातपात असू शकतो असा संशय तिने दशक्रिया विधी प्रसंगी व्यक्त केला.. त्याचाच राग मनात धरून उपस्थित आणि पतीच्या बहिणीने तिला मारहाण करण्यास सुरुवात केली.

तिच्या तोंडाला काळ करत चपलांचा हार घालून गावातून तिची धिंड काढण्यात आली. पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी ही घटना नाशिक जिल्ह्यातील शिवरे गावात घडली.. ऐकूया या महिलेची आपबीती..

या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाला आणि त्यात सदर पीडित महिलेने आप बीती कथन केली. पोलिसात कुठलाही गुन्हा दाखल होऊ शकला नाही मात्र घटनेच्या पार्श्वभूमीवर सदर गावात पोलिसांकडून पेट्रोलिंग करण्यात आलं अशी माहिती पोलिसांच्या सूत्रांकडून देण्यात आली.

मात्र या घटनेने महिला किती सुरक्षित आहेत आणि पुरोगामी महाराष्ट्रात महिलांसोबत असे प्रकार घडत असतील तर सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

या बातमीनंतर पोलिसांना जर जाग आली तर अशी घटना घडवणाऱ्यांवर तात्काळ पोलिसी कारवाई व्हावी हीच अपेक्षा आणि महिलेला संरक्षण मिळावं हीच भावना.


नाशिकहून तेजस पुराणिक जिल्हा प्रतिनिधी एमडी टीव्ही न्यूज नाशिक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here