Home जळगाव चोपडा तालुक्यात लाल कांदा काढणी अंतिम टप्प्यात..
केळीचा जिल्हा म्हणून जळगाव जिल्ह्याची ओळख.. त्यात जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुका हा कांद्याचा तालुका म्हणून ओळखला जात असतो.
कांदा काढण्याचे काम आता बळीराजाचं अंतिम टप्प्यात पोहोचलंय. तालुक्यातील अडावद धानोरा , गणपुर,लासुर, चहार्डी,चोपडा या गावात प्रामुख्याने लाल कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. बाजारात या पिकाला भाव मिळालेच अशी शाश्वती उरली नाही.
तरीदेखील या तालुक्यात या पिकाला शेतकरी अधिक पसंती देतात. सध्या वातावरणात होणाऱ्या बदलांचा फटका मात्र शेतकऱ्यांना बसताना दिसतो. त्यामुळे बाजारभाव कमी मिळतो. आणि हा लाल कांदा बळीराजाच्या डोळ्यात पाणी आणतो.
त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालंय.. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी या पिकाला योग्य तो जादा भाव मिळवून देण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
लासुर चोपड्याहून आत्माराम पाटील एमडी टीव्ही न्यूज प्रतिनिधी
error: कॉपी करू नका..!