जनजागृती रॅली दिला कुष्ठरोग निवारण संदेश …

0
508

रॅलीचे उद्घाटन. डॉ. गोविंद चौधरी, जिल्हा आरोग्य अधीकारी, जि.प. नंदुरबार यांचे हस्ते महात्मागांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार व दिपप्रज्वलन करून करण्यात आलं .

image

रॅलीसाठी एकलव्य विद्यालय, डि.आर माध्यमीक विद्यालय, एन्जल नर्सिंग कॉलेज व देवमोगरा नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थीनी / विदयार्थी व शिक्षकांनी सक्रीय सहभाग नोंदविला.उपस्थितांनी कुष्ठरोग बाबतची प्रतिज्ञा घेतली. तसेच कुष्ठरोग या बाबत जनजागृतीपर घोषणा व माहिती पत्रिका, हस्तपत्रिका वाटप करण्यात आलं .

image 1

यावेळी डॉ. अमित पाटील अतिरीक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, रविंद्र कळमकर पो. निरिक्षक नंदुरबार, युनूस पठाण शिक्षणाधिकारी (माध्यमिक) नंदूरबार, सतिश चौधरी उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) नंदुरबार,
डॉ. सुलोचना बागुल निवासी वैद्यकिय अधिकारी जिल्हा रुग्णालय, डॉ. शिवाजी राठोड प्राचार्य जिल्हा प्रशिक्षण केंद्र उपस्थित होते .

पंधरवाडा साजरा करण्यात येणार असून त्यात विविध कार्यक्रम होतील ..
प्रविण चव्हाण एम. डी. टीव्ही न्यूज, नंदुरबार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here