नेर,खंडलाय शिरदाने,जुने भदाने,नवे भदाने,अकलाड,मोराने,कुसुंबा,नांद्र,उभंड,लोणखेडी,लोहगड या परिसरामध्ये देखील जोरदार पावसाने हजेरी लावली .
पावसात कांदा पिक गहू फळबाग असे रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं .कांदा पीक व गहू हा वाऱ्यामुळे पूर्णपणे खाली जमिनीदोस झाला असून गहू पिकांना देखील या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसलेला आहे.
मात्र शेतकऱ्यांच्या अवघ्या काही दिवसांवर गहू पीक हे काढण्याएवढे झालेले होते.मात्र ऐनवेळेस पावसाचा फटका बसल्याने गहू पिकाचे मोठे नुकसान झालेले आहे .शेतकऱ्यांकडून पंचनामे करुन भरपाईची मागणी त्वरित केलीय ..
नेरहून दिलीप साळुंखे प्रतिनिधी एम डी टी व्ही न्यूज