प्रवासी महासंघाने राबवला रथसप्तमी उपक्रम

0
871

ग्राहक पंचायत चे संस्थापक अध्यक्ष बिंदू माधव जोशी प्रणित प्रवासी महासंघाच्या नंदुरबार तालुका शाखेतर्फे हा उपक्रम राबवण्यात आला. निमित्त होतं रथसप्तमीचं.

प्रथम स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. बस स्थानकातील प्रवासी आणि विद्यार्थ्यांना तिळगुळ देऊन त्यांचा गोडवा वाढवला. यावेळी आयोजकांनी उपस्थित असलेल्या प्रवासी आणि विद्यार्थ्यांना रथसप्तमीचे महत्व विशद केलं.

अबोली चंद्रात्रे आणि महादू हिरणवाळे यांच्या हस्ते चालक आणि वाहकांचा सन्मान करण्यात आला. आयोजकांच्या वतीने बी डी गोसावी, योगेश्वर जळगावकर, विश्वास बागुल, आगारप्रमुख मनोज पवार, वाहतूक निरीक्षक आरजी वळवी, वाहक दिपाली मराठे, डॉक्टर गणेश ढोले, वासुदेव माळी, आदी मान्यवर उपस्थित होते. या अनोख्या उपक्रमाचं कौतुक करण्यात आलं.

नंदुरबार हुन एमडीटीव्ही न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी प्रवीण चव्हाण..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here