गुन्हेगारी टोळीतील 07 इसम 2 वर्षांसाठी नंदुरबार जिल्ह्यातुन हद्दपार..

0
1052

नंदुरबार -३०/४/२३

जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच गुन्हेगारांवर वचक राहावा याकरीता नंदुरबार पोलीस अधीक्षक पाटील यांनी नंदुरबार जिल्ह्यातील गुन्हेगारी टोळीतील एकुण 07 इसमांना महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 चे कलम 55 च्या प्राप्त अधिकारान्वये नंदुरबार जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी हद्दपार केलेले आहे.
हद्दपार करण्यात आलेले सर्व 07 इसम हे नंदुरबार तालुक्यातील आहेत.

नंदुरबार तालुका पोलीस ठाणे हद्दीत राहणाऱ्या टोळीतील 07 इसमांविरुध्द् मालमत्तेविरुध्द्चे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यावरुन नंदुरबार तालुका पोलीस ठाणे कडून एक टोळीस हद्दपार करणे बाबतचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक कार्यालयात प्राप्त झाला.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.

https://bit.ly/3UoK7E0

सदर हद्दपार प्रस्तावाचा पोलीस अधीक्षक, पी.आर.पाटील यांनी आढावा घेवुन प्रस्तावाची छाननी केली.
तसेच योग्य ती कायदेशीर प्रकिया पार पाडून 07 इसमांना 02 वर्ष कालावधी साठी नंदुरबार जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक, पी.आर.पाटील यांनी दिनांक 28 एप्रिल रोजी दिले आहेत.

टोळीतील हद्दपार इसमांची नांवे

अर्जुन भिला पवार (24 ) रा. चाकळे ता. जि. नंदुरबार, सागर शिवनाथ पाडवी (19) रा. चाकळे ता. जि. नंदुरबार,
लखन बापु भिल (22) रा. शनिमांडळ ता.जि. नंदुरबार,
ज्ञानेश्वर वसंत मोरे (19 ) रा. शनिमांडळ ता.जि. नंदुरबार,
न्हानभाऊ भगवान भिल (25) रा. शनिमांडळ ता.जि. नंदुरबार, किरण मंगलसिंग भिल (25) रा. तिलाली ता.जि. नंदुरबार,
विपुल सुरेश कोळी ( 23 ) रा. तिलाली ता.जि. नंदुरबार असे आहेत.
हद्दपार आदेशाची अमंलबजावणी तातडीने करण्यात येत असुन हद्दपार इसमांनी आदेश प्राप्त झाल्यावर 48 तासाचे आंत तातडीने जिल्हा हद्दीबाहेर निघुन जाणे बाबत आदेश देण्यात आले आहेत.

तसेच हद्दपार इसमांनी नंदुरबार जिल्ह्यात येतांना पोलीस अधीक्षक व न्यायालयाची परवानगी घेणे आवश्यक आहे. हद्दपार आदेशाचे उल्लंघन झाल्यास त्यांचे विरुध्द् प्रचलीत कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.
तसेच वरील 07 हद्दपार इसम नंदुरबार जिल्ह्यात कुठेही दिसुन आल्यास तात्काळ स्थानिक पोलीस ठाणे किंवा पोलीस नियंत्रण कक्ष, नंदुरबार यांना कळवावे असे नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी आवाहन केले आहे.

प्रविण चव्हाण एम डी टी व्ही न्यूज जिल्हा प्रतिनिधी नंदुरबार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here