नंदुरबार : दि.१०/०२/२०२३
शहादा येथील तालुका खरेदी-विक्री संघाच्या प्रांगणात नुकतंच नाभिक समाजाचा सामूहिक विवाह सोहळा संपन्न झाला.
गुजर नाभिक समाज पंचमंडळ आणि संत सेना नाभिक समाज मंडळाच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळ्याचा आयोजन करण्यात आलं होतं. सजवलेल्या ट्रॅक्टर वर नवरदेवांची शोभायात्रा काढण्यात आली. सकाळी 10:30 वाजेच्या मुहूर्तावर सामुदायिक विवाह सोहळा संपन्न झाला.
नंदुरबार जिल्ह्यातील सहभागी वधू मातेस महिला व बालकल्याण विभागाच्या कन्यादान योजनेतून दहा हजार रुपयांचा अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली. अनेक दानशूर व्यक्तींनी अन्नदानासाठी सहकार्य केलं.
भोजन कक्षात बेटा बेटी एकसमान ,बेटी बचाव बेटी पढाव,अन्न पाणी वाचवा असे संदेश फलक लोकांचं लक्ष वेधून घेत होते. महाराष्ट्र गुजरात आणि मध्य प्रदेश या तीन राज्यातील सुमारे चार ते पाच हजार नाभिक समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या परिसराला यामुळे यात्रेचं स्वरूप प्राप्त झालं होतं. माजी आमदार उदयसिंग पाडवी यांनी या संपूर्ण सोहळ्याचं आपल्या मनोगतात कौतुक केलं. आमदार राजेश पाडवी ,माजी आमदार उदयसिंग पाडवी, दीपक पाटील, राम रघुवंशी, मकरंद पाटील, अभिजीत पाटील ,गटविकास अधिकारी संजय सोनवणे, डॉक्टर तुषार सनांसे, घनश्याम पाटील,संतोष पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.
शहादाहून संजय मोहिते एम डी टी व्ही न्यूज प्रतिनिधी..