१२ वी निकाल उद्या : कुठे पाहाल निकाल ?

0
285

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे,नागपूर,औरंगाबाद,मुंबई,कोल्हापूर, नाशिक,अमरावती,लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळातर्फे फेब्रुवारी, मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या १२ वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल आताच समोर आलेल्या माहितीनुसार, उद्या गुरुवारी १२ वीचा लागणार आहे. ८ जून रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास राज्यातील १२ वीचा निकाल लागेल. विविध सांकेतिक स्थळांवर निकाल पाहता येणार आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

यावर्षी फेब्रुवारी – मार्च महिन्यात झालेल्या राज्यातील सर्व विभागांचे १० वी आणि १२ वी बोर्डाचे निकाल हे येत्या काही दिवसातच जाहीर होतील, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी नुकतीच दिली होती. त्यानुसार गुरुवारी ८ जूनला बारावीचा निकाल लागणार आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही बारावी बोर्डाचा निकाल दुपारी एक वाजताच्या सुमारास जाहीर होण्याची शक्यता आहे. हे सर्व निकाल ऑनलाईन पद्धतीनं पोर्टलवर जाहीर होणार आहेत. विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर आणि त्यांच्या आईचं नाव देऊन आपला निकाल बघता येईल अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

निकाल पाहण्यासाठी या संकेस्थळाना जावे लागणार !

1)- mahresult.nic.in, 2)- https://hsc.mahresults.org.in, 3)- htpps://hscresult.mkcl.org, 4) – https://hindi.news18.com/news/career/board-result-maharashtra-board, 5)- https://www.indiatoday.in/education-today/mharashtra-board-clasaa-12th-result-2023, 7)- http://mh12abpmajha.com या संकेतस्थळांवर पाहता येऊ शकतो.

निकाल हा ऑनलाईन पद्धतीनं जरी इंटरनेटवर दिसत असला तरीही क्रॉस चेक केल्यानंतर निकालाच्या दोन ते तीन प्रिंट्स घेऊन ठेवणं आवश्यक आहे. कॉलेजमधून निकालाची ओरिजनल प्रिंट मिळण्यासाठी अनेक दिवस लागतात. मात्र तेवढ्यात पुढील प्रवेश प्रक्रिया सुरु होत असते. यासाठी निकालाची प्रिंट घेऊन ठेवणं आवश्यक आहे.

एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो, नंदुरबार-मुंबई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here