नाशिक -२४/५/२३
नाशिकची वाटचाल देशाची लाॅजेस्टिक कॅपिटलकडे सुरु असून त्यास बूस्ट देण्यासाठी नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने आयोजीत चार दिवसीय ऑटो अँड लॉजीस्टिक एक्स्पोचे उद्घाटन गुरुवारी (दि.२५) केंद्रिय आरोग्य राज्यमंत्री डाॅ.भारती पवार यांच्या हस्ते ठक्कर डोम येथे सायंकाळी पाच वाजता होणार आहे.
यावेळी पालकमंत्री, खासदार, आमदारांसह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व ट्राॅन्सपोर्ट इंड्रस्टीजमध्ये पन्नासवर्ष सेवा देणारे चालक किसन पवार, मेहबूब पठाण या वाहकांनाही उद्घाटनाचा मान दिला जाईल, अशी माहिती नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट अध्यक्ष राजेंद्र (नाना) फड व वरिष्ठ उपाध्यक्ष पी.एम.सैनी यांनी दिली.
ऑटो अँड लॉजिस्टिक्स एक्स्पोचे वैशिष्ट म्हणजे अगदी सायकलपासून ते अवाढव्य जेसीबी, ट्रेलर देखील या ठिकाणी प्रदर्शनाला भेट देणार्यांना पहायला मिळेल.
एकप्रकारे ट्रान्सपोर्ट व्यवसायाचा इतिहास ते भविष्य याचा प्रवास उलगडला जाईल.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
गुरुवारी उद्घाटनानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी राहणार आहे. त्यात विविध राज्यातील कलांचे सादरीकरण केले जाईल.
शुक्रवारी (दि.२६) राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
प्रदर्शनाची पाहणी केल्यानंतर त्यांच्या हस्ते ‘कोशिषे कामयाबी की’ पुरस्कार वितरण सोहळा केला जाईल. त्यात मागील पन्नास वर्षांपासून ट्रान्सपोर्ट व्यवसायात काम करणार्या वाहकांचा तसेच ट्रान्सपोर्ट क्षेत्रातील यशस्वी उद्योजकांचा सन्मान मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते सत्कार केला जाईल.
त्याअगोदर दुपारी तीन वाजता ट्रक चालक आणि त्यांच्या पत्नी यांच्यासाठी ‘होम मिनिस्टर’ या धमाल गेम शोचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवारी (दि.२७) दुपारी २ वाजता ऑर्केस्ट्रा लिट्ल वंडर तर सायंकाळी ६ वाजता चलती का नाम गाडी या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
प्रदर्शनाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे रविवारी (दि.२८) दुपारी ३ वाजता ‘मिले सुर मेरा तुम्हारा’ हा सांस्कृतिक कार्यक्रम तर सायंकाळी सात वाजता भाजप नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एक्सपोचा समारोप होईल.
या एक्स्पोसाठी नाशिक जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले आहे. ट्रान्सपोर्ट इंडस्ट्रिसह नाशिककरांनी या एक्स्पोला आवर्जून हजेरी लावावी व प्रदर्शनासह फूड फेस्टिवलसह सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी घ्यावी असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
फुड फेस्टिव्हल आकर्षण
प्रदर्शनाला देशभरातील नामवंत हस्तींसोबत मोठ्या संख्येने नागरिक भेट देणार आहे. त्यामुळे एक्स्पोत देशभरातील व्यंजनाचा सहभाग असलेले ‘एक देश अनेक व्यंजन’ फूड फेस्टिवल मुख्य आकर्षण असणार आहे. चारही दिवस हे फूड फेस्टिवल सुरू राहणार असून नाशिककरांना या फूड फेस्टिवलचा आनंद घेता येणार आहे.
कुशल अकुशल कामांसाठी रोजगार मेळावा
स्किल डेव्हलमेंट विभाग महाराष्ट्र शासन व नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएनकडून कुशल व अकुशल कामगारांसाठी रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यामाध्यमातू रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मंडपाचे भूमीपुजन
नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दि.२३ रोजी सकाळी मंडपाचे भूमिपूजन करण्यात आले.
”दळणवळण क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत असल्याने ट्रान्सपोर्ट क्षेत्र अतिशय गतिशील पद्धतीने बदलत आहे. त्यामध्ये असलेल्या नाविन्यपूर्ण संधी व तंत्रज्ञान त्या अनुषंगाने ट्रान्स्पोर्ट व्यावसायिकानी करावयाचे बदल तसेच सारथी सुविधा केंद्राची निर्मिती हा एक्स्पोचा मुख्य उद्देश आहे.
”राजेंद्र (नाना) फड, अध्यक्ष नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशन
तेजस पुराणिक ,जिल्हा प्रतिनिधी ,नाशिक , एम डी टी व्ही न्यूज