पंतप्रधान मोदींच्या एका ‘कॉल’ची जगभरात चर्चा! ट्रम्प यांच्या ५००% tariff च्या धमकीमागे ‘हे’ आहे कारण?
भारत आणि अमेरिकेच्या व्यापारी संबंधांमध्ये सध्या एक मोठी खळबळजनक चर्चा सुरू आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांनी भारतावर ५०० टक्के tariff (आयात शुल्क) लावण्याची धमकी दिली आहे. पण या धमकीमागे केवळ व्यापार नाही, तर एका ‘फोन कॉल’चं राजकारण दडलं असल्याचं अमेरिकेकडून सांगण्यात येत आहे. नेमकी काय आहे ही भानगड? पाहूया या विशेष रिपोर्टमध्ये.(Trump Vs Modi)
एका फोन कॉलमुळे ‘डील’ फिसकटली?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प (Trump Vs Modi ) यांना फोन न केल्यामुळे एक महत्त्वाची व्यापारी डील पूर्ण होऊ शकली नाही, असा दावा अमेरिकेकडून करण्यात आला आहे.
ट्रम्प यांचा ‘ईगो’ दुखावला? असं म्हटलं जातंय की, मोदींनी फोन केला असता तर ट्रम्प यांना त्याचं श्रेय घेऊन जगभरात बढाई मारण्याची संधी मिळाली असती. पण फोन न आल्यामुळे दुखावलेल्या ट्रम्प यांनी आता भारतावर थेट ५०० टक्के tariff लावण्याची धमकी दिली आहे.
« व्हॉट्सॲप ग्रुप मध्ये Add होण्यासाठी»
https://chat.whatsapp.com/FQfMCno9tqKJ0jAsNj0HZA
‘एम.डी टीव्ही’ चं Facebook Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
🧐 मोदींनी ट्रम्प यांना ‘कॉल’ का केला नाही?
पंतप्रधान मोदींच्या या निर्णयामागे एक मोठी कूटनीतिक रणनीती असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
सावध पाऊल: डोनाल्ड ट्रम्प यांचा स्वभाव पाहता, ते अनेकदा घाईघाईत स्वतःचे निर्णय लादण्याचा प्रयत्न करतात.
जपान आणि ब्रिटनचा अनुभव: यापूर्वी जपान आणि ब्रिटनला ट्रम्प यांच्या अशा ‘बार्गेनिंग’ पद्धतीचा फटका बसला आहे. ट्रम्प यांना कोणतीही वरचढ संधी मिळू नये, म्हणूनच मोदींनी अतिशय सावधगिरीने वागत त्यांना फोन करणे टाळले असावे, असे तज्ज्ञांचे मत आहे.
थोडक्यात सांगायचं तर, भारताचे हितसंबंध जपण्यासाठी पंतप्रधान मोदींनी घेतलेली ही ‘वेट अँड वॉच’ची भूमिका आता अमेरिकेला खुपतेय का? आणि ट्रम्प यांची ही ५०० टक्के tariff ची धमकी प्रत्यक्षात येणार की हे केवळ दबावाचे राजकारण आहे? हे येणारा काळच ठरवेल.
« व्हॉट्सॲप ग्रुप मध्ये Add होण्यासाठी»
https://chat.whatsapp.com/FQfMCno9tqKJ0jAsNj0HZA
ब्युरो रिपोर्ट, [MDTV NEWS].


