तळोदा:- येथील आर्ट ऑफ लिव्हिंग परिवारातर्फे प.पू.गुरुदेव श्री.श्री.रविशंकर यांच्या ६७ व्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात ५३ दात्यांनी रक्तदान केले.
जगाला जीवन जगण्याची कला शिकवणारे आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते, आध्यात्मिक गुरू श्री.श्री.रविशंकर यांचा वाढदिवस सेवा, साधना, सत्संग आणि गरजू रुग्णांना वेळेवर रक्त मिळावे, यासाठी शिबिर अश्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करून साजरा करण्यात आला.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
संत सावता माळी भवन याठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी महासुदर्शन क्रिया, महासत्संग व प्रसादी असे कार्यक्रम घेण्यात आले. रक्त संकलन धुळे व तळोदा येथील रक्त साठवणूक केंद्राचे डॉ.प्रशांत पाटील, डॉ.सुनील चौधरी, रक्त केंद्र तंत्रज्ञ चंद्रकांत दंडगव्हाण, कैलास चौधरी, पल्लवी पावरा यांनी केले.
कार्यक्रमासाठी तळोदा येथील आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराचे लवकेश गुरुजी सुरत , स्वप्निल राणे, सविता कलाल, सेवानिवृत्त मुख्याध्यापक अजित टवाळे, रवींद्र मगरे, शिरीष माळी, संतोष पवार, उदय सुर्यवंशी, जगदिश शिरसाठ, मुकुंद वाघ, मनिष कलाल, मुकेश कर्णकार ,सौ नलीनी मगरे, शितल माळी, नितीका पवार, योगिता मगरे उपस्थित होते.
महेंद्र सूर्यवंशी. एम.डी.टी.व्ही. न्युज, तळोदा.