नेर येथील 7 पेहलवानांची सोलापूर येथे राज्यस्तरीय कुस्तीसाठी निवड

0
918
7 wrestlers from Ner selected for state level wrestling at Solapur

धुळे: धुळे तालुक्यातील नेर येथील सात पेहलवानांची स्टेअर्स फाऊंडेशन शिरपूर तर्फे नेर येथील पेहलवनांची सोलापूर येथे राज्यस्तरीय कुस्तीसाठी निवड करण्यात आली आहे.तसेच वस्तदांची युवा कार्यक्रम व खेल मंत्रालय भारत सरकार आणि राष्ट्रीय खेल संवर्धन संस्था (NSPO)यांचे वतीने आयोजित

आज दिनांक 02/10/2023 रोजी शिरपूर येथे जिल्हा,राज्य,राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी कुस्ती स्पर्धेत शिवाजी विजय व्यायाम शाळा नेर येथील वस्तादांनी २८ किलो राज योगेश कोळी प्रथम क्रमांक पटकावला, व.३८किलो,साई मगन पवार प्रथम क्रमांक,५५ किलो,खुशाल मगन पवार प्रथम, ५५ किलो विशाल बंडू नेरकर प्रथम ४१ किलो हर्षल प्रकाश कोळी प्रथम ८४ किलो सुमित रतीलाल कोळी प्रथम,५५ किलो,दिनेश नाना कोळी याने तृतीय क्रमांक पटकावला आहे.

WhatsApp Image 2023 10 04 at 9.42.31 PM

 व त्यांचे सहकारी वस्तादांच्या अनमोल मार्गदर्शनाने शिवाजी विजय व्यायाम शाळेच्या मल्लांनी जिल्हा स्तरीय कुस्त्या जिंकून विजय रथ खेचून आणला.विजयी मल्लांची राज्य स्तरीय स्पर्धेत निवड झाली.

जिल्ह्यात नेर गावाचे नाव लौकिक केले असून स्टेअर्स फाऊंडेशनच्या वतीने शिरपूर येथे आयोजित झालेल्या कुस्ती स्पर्धेत शिवाजी विजय व्या शाळेचा पठ्ठा हर्षल कोळी याची होणाऱ्या सोलापूर राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत नेर गावातील वस्ताद ४१ किलो वजन गटात निवड करण्यात आली आहे.तसेच सर्व विजयी मल्लांचे मनःपूर्वक अभिनंदन

व सर्व मार्गदर्शक वस्तादांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.तसेच

विजेते मल्लांना पुढील राज्य स्तरीय व राष्ट्रीय स्तरावर कुस्ती स्पर्धेत यशस्वी होण्यास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा देखील देण्यात आल्या.तसेच सर्व  निवड झालेल्या वस्तादांचे देखील नेर ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.

✍🏻 MD TV न्यूज धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंखे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here