नंदुरबार :२४/२/२३
रक्तदानाबाबत समाजामध्ये जनजागृती व्हावी यादृष्टीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,नंदुरबार व जिल्हा सामान्य रुग्णालय, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने नंदुरबार जिल्ह्यातील तळवे ता.तळोदा व अक्कलकुवा येथे ‘रक्तदान शिबीर’ संपन्न झाले.
या शिबिरामध्ये तळवे येथील 17 व अक्कलकुवा येथे 20 असे एकूण 37 रक्तदात्यांनी सहभाग घेतला.
या शिबिरास प्रमुख पाहुणे म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.शिवाजी सुक्रे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तंज्ञ अध्यापक डॉ.सतिश वड्डे, नोडल अधिकारी डॉ.संतोष पवार, सहयोगी प्राध्यापक डॉ.सुधाकर बंटेवाड, सहायक प्राध्यापक डॉ.रमा वाडेकर, तंत्रज्ञ योगेद्र राजपूत, जितेंद्र वाणी उपस्थित होते.
यावेळी डॉ.सुक्रे म्हणाले की, अपघात, रक्तश्राव, माता प्रसवकाळ आणि शस्त्रक्रिया या स्थितीमध्ये अधिक रक्तश्राव होण्याची शक्यता असते .
अशा वेळी एखाद्या व्यक्तींचे प्राण वाचविण्यासाठी त्या रुग्णांला त्वरीत रक्त देणे आवश्यक असते तसेच थॅलेसिमीया, ल्युकिमीया, सिकलसेल व ॲनेमिया या विकाराने पिढीत असलेल्या रुग्णांना वारंवार रक्ताची आवश्यकता पडत असल्याने अशा रुग्णांना निरोगी व्यक्तींने रक्तदान केल्यास त्याव्यक्तिंचा जीव वाचविता येतो.
म्हणून रक्तदान हे सर्व श्रेष्ठदान असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रवीण चव्हाण नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी एम. डी .टी. व्ही. न्यूज नंदुरबार