नंदुरबार -१०/६/२३
जनावरांचे उघड्यावर मांस विक्री प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे. त्याच्याकडून ४२०० रु. किंमतीचे मांस जप्त करण्यात आले आहे. ही करवाई शुक्रवार (दि.९) कसाईवाडा, तळोदा येथे करण्यात आली.
पो.नाईक विशाल नागरे (स्था.गु. शा.)यांच्या फिर्यादी वरुन कलम- महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ५ (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपी हा कसाई वाडा, तळोदा येथे उघड्यावर जनावरांचे मांस विक्री करत होता.
याबाबत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पंच समक्ष तळोदा पोलीस स्टेशन येथुन खाजगी वाहनाने मेन रोड, कसाईवाडा येथे आलो असता. एक इसम उघड्यावर जनावरांचे मांस विक्री करतांना मिळून आला.
हे सुध्दा वाचा:
BREAKING.. पुलकित सिंग यांची धडक कारवाई.. अक्कलकुव्यात दोन लाखाचे बियाणे जप्त.. – MDTV NEWS
BIG BREAKING… मविआ नेते खा.शरद पवार व खा.संजय राऊत यांना धमकी – MDTV NEWS
जावयाचा खून! तिघांना जन्मठेप.. – MDTV NEWS
ताबडतोब संबंधित गुन्हेगारावर कठोर कारवाई करा : भुजबळांची मागणी .. – MDTV NEWS
ब्रेकिंग -उद्धव ठाकरेंना शिंदेंचा जबरदस्त झटका .. सेना भवनाला सुरुंग.. – MDTV NEWS
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
त्याच्याकडे मांस विक्री परवाना आहे किंवा कसे याबाबत विचारपूस केली असता त्याच्याकडे कुठलाही परवाना नसल्याचे त्याने सांगितले. सदर इसम त्याच्याकडे ४२०० रु. किंमतीचे ३० किलो जनावरांचे मांस मिळुन आले.
वजनकाटा सोबत १किलो वजनाचे माप व १ धारदार लोखंडी सुरा जप्त करण्यात आला.
याप्रकरणी युनूसखान इस्माईलखान कुरेशी वय ४५ राहणार कसाईवाडा,तळोदा यावर पोलीस नाईक विशाल नागरे यांच्या फिर्यादवरून महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ५ (क) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
जप्त करण्यात आलेले मांस नगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांकडून नष्ट करण्यात आले.
नितीन गरुड ,तळोदा तालुका प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज