उत्तर महाराष्ट्रात ऊन सावल्यांचा खेळ…. मुंबईत हलक्या सरी !

0
191

बिपरजॉय चक्रिवादळामुळे हवामानात बदल झाला असून या बदलामुळे मुंबई, ठाणे व राज्यातील अनेक भागात पावसाने हलक्या स्वरूपात हजेरी लावली आहे. राज्यात अनेक जिल्ह्यात आज सकाळ पासून ढगाळ वातावरण असून वाऱ्याची गती वाढली आहे. मुंबईत पावसाच्या सरी कोसळल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव या जिल्ह्यांमध्ये सकाळपासून ऊन सावल्यांचा खेळ सुरु आहे. ऊन कमी झाले असले तरी मात्र उकाडा वाढला आहे. त्यामुळे वृद्ध व लहान मुलांच्या जीवाची काहिली होतांना दिसून येत आहे. नंदुरबार जिल्ह्यात आज बुधवारी ४०.४ अंश तापमानाची नोंद झाली आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

मुंबई, ठाणे, पालघर या परिसरात पावसाला पहाटेपासून सुरवात झाली असून मुंबईसह उपनगरात मंगळवार संध्याकाळपासून पावसाची रिमझिम पहायला मिळत आहे. ठाणे जिल्हातील अनेक भागात मंगळवारपासून पावसाची संततधार सुरु आहे. पावसाच्या आगमनामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळत आहे.

हे सुध्दा वाचा

भावाचा खुनाचा असा घेतला त्यांनी बदला … चौघांना पोलिसांनी केली अटक – MDTV NEWS

नंदुरबारात ९ वर्षात विकासाला गती : कोट्यवधींची कामे – MDTV NEWS

शिरपूर तालुका पोलीस : अवैध मद्य वाहतूक करणारे वाहन ताब्यात .. – MDTV NEW

उत्तर महाराष्ट्र, विदर्भात मात्र पावसाची प्रतिक्षा कायम आहे. वसई विरारमध्ये ढगाळ वातावरण असून कालपासून रिमझिम पाऊस सुरु आहे. तसेच विरार पूर्व, विवा जहांगीड परिसरात ऋषी विहार समोर फांद्या तुटल्या आहेत.महापालिकेने पावसाळ्यापुर्वी झाडांच्या फांद्या तोडल्या नसल्यामुळे पावसात या फांद्या तुटुन पडल्या आहेत या मध्ये कोणतेही नुकसान झालेले नाही. उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव या जिल्ह्यांमध्ये सकाळपासून ऊन सावल्यांचा खेळ सुरु आहे. ऊन कमी झाले असले तरी मात्र उकाडा वाढला आहे. त्यामुळे वृद्ध व लहान मुलांच्या जीवाची काहिली होतांना दिसून येत आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

पालघर जिल्ह्यामध्ये देखील पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. वादळी वाऱ्यासह जिल्ह्यातील काही भागात पाऊस पहायला मिळत आहे. डहाणू, तलासरी परीसरात आज सकाळपासून जोरदार पाऊस होत आहे. कोसबाड कृषी हवामान केंद्राच्या अंदाजानुसार जिल्ह्यातील काही ठिकाणी आज आणि उद्या पावसाची हजेरी कायम राहणार आहे. केरळ, दक्षिण कर्नाटक किनारपट्टी व कोकण किनारपट्टीवर पावसाचे ढग दाटून आले असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.

एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो नंदुरबार / मुंबई.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here