सफाळे शहरातून काढण्यात आली भव्य मिरवणूक आणि रॅली
सफाळे /पालघर – २४/४/२३
डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती सफाळे यांच्या विद्यमाने विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीचे औचित्य साधून दिनांक 22 एप्रिल 2023 रोजी जिल्हा परिषद शाळा नं १ सफाळे पूर्व समाज हॉल येथे देशातील तमाम महापुरुषांचा संयुक्त जयंती सोहळा हजारो नागरिकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.
सदर जयंती सोहळा दिवस भरात तीन सत्रात साजरा करण्यात आला.
सकाळी पहिल्या सत्रामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र सफाळे येथून सकाळी 9.00 वाजता महापुरुषांच्या प्रतिमांची भव्य मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली .
दुसऱ्या सत्रात दुपारी 3.30 वाजता महापुरुषांच्या विचारांवर नृत्य स्पर्धा घेण्यात आल्या.
सदर स्पर्धेमध्ये लहान गट व मोठा गट अशा दोन गटांमध्ये स्पर्धा पार पडल्या. सदर स्पर्धेसाठी जिल्ह्यातून उस्फूर्तपणे सहभाग मिळाला सदर स्पर्धेला परीक्षक म्हणून लाभलेले आयुष्यमान जतीन कदम सर ( शिक्षक) तसेच करण राबडे (नृत्य शिक्षक) तसेच सुमित राऊत (गीतकार व गायक )यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले ..
तिसऱ्या सत्रात सायंकाळी 6.00 वाजता सभेच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
अनंत भवरे सर संविधान विश्लेषक यांनी उपस्थित जनसमुदायास संबोधित करताना भारतीय संविधान व त्यातील मूलभूत अधिकार समता स्वातंत्र्य बंधुत्व आणि न्यायव्यवस्था हे तळागाळातील शोषित पीडित वंचित समूह व प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या प्रत्येक बहुजन वर्गाने करायला पाहिजे तीच खरी श्रद्धांजली विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना असेल असं म्हटलंय .
सदर कार्यक्रमात दरवर्षीप्रमाणे एस.सी एस.टी दहावी व बारावी इयत्तेत प्रथम तीन क्रमांकात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिष्यवृत्ती बहाल करून गुणगौरव करण्यात आले.
सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात भरीव काम करणारे कुणाल भोईर , मिलिंद रणदिवे , राजन गरुड यांचा सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष आयु संतोष कांबळे यांनी केले ..
सूत्रसंचालन समितीचे सचिव .राजन गरुड व सहसचिव स्वाती भोइर यांनी केलं ..
शुभांगी शेष यांनी आभार मानले ..
यावेळी मंडळाच्या उपाध्यक्ष .अर्चना अशोक जाधव ,समिधा मोहिते सहसंघटक , नेत्रा कांबळे, , शिला साळवे वसंत बोराडे, शिवा बोराडे, विजय कांबळे, रमाकांत गायकवाड, भानुदास लोखंडे, नितेश जाधव, विदेश कापसे, योगेश राऊत, सदाशिव मोरे, दिनेश जाधव यांनी सदर कार्यक्रम यशस्वी होण्यास मोलाचे सहकार्य केले..
सफाळे प्रतिनिधी ,ऋषीकेश जाधव ,एम डी टी व्ही न्यूज ..