दर्शनासाठी लांबच लांब रांग, मग झालं असं काही की महिला थेट पोहोचली आत…

0
179

नवी दिल्ली :२१/२/२३

आपण कुठेही मंदिरात दर्शनासाठी गेलो तरी लांबलचक रांग तुम्हाला पहायला मिळते.

काही मंदिरांमध्ये तर गाभाऱ्यापासून खूप लांबपर्यंत रांग असते. त्यामुळे दर्शन घेण्यासाठी बराच काळ वाट पहावी लागते. मात्र या लांबलचक रांगेमधूनही वाट काढत एका महिलेनं दर्शन घेतलं आहे.

तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यावर अनेक प्रतिक्रिया पहायला मिळत आहे.

एक साडी नेसलेली महिला केस मोकळे ठेवून येते.

व्हिडिओवरुन महिलेच्या अंगात आल्याचं दिसत आहे. त्यामुळे रांगेत वाट पाहणाऱ्या भाविकांना मागे टाकून ती पुढे जात आहे. तिला कोणीही अडवत नाही.

मात्र, तेथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने महिलेचा व्हिडिओ बनवला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला, ज्यानंतर लोक लिहित आहेत की मंदिरातील रांग टाळण्याचा हा एक चांगला मार्ग आहे.

हा व्हिडिओ ट्विटर युजर वैशाली @Kokanchi_Rani ने 20 फेब्रुवारीला पोस्ट केला होता.

हा व्हिडीओ शेअर करत तिने लिहिलं, ‘मंदिरामधील रांग टाळण्याचा सर्वात सोपा मार्ग’.

या व्हिडीओला 1 लाख 73 हजारांहून अधिक व्ह्यूज आणि सुमारे 3 हजार लाइक्स मिळाले आहेत.

यावर सर्व वापरकर्त्यांनी प्रतिक्रिया दिल्या.

अनेकांना वाटत आहे की ‘महिलेच्या खरंच अंगात आलं आहे तर काहीजण हा रांग टाळत दर्शन घेण्याचा सोपा मार्ग’ असल्याचं म्हणत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

एम .डी. टी. व्ही. न्यूज ब्युरो,न्यू दिल्ली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here