कामगार दिनाच्या पार्श्वभूमीवर रेखाटली ” हि ” रांगोळी ..या,पहा आणि अनुभवा एकदा.. सुंदर कलाकृती ..
नाशिक -२९/४/२०२३
आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचे औचित्य साधून रंगसंगती ग्रुप आणि सिटी सेंटर मॉल यांच्या संयुक्त विद्यमाने, सिटी सेंटर मॉल येथे एक भव्य रांगोळी साकारण्यात आली आहे.
या रांगोळीचा विषय कामगार आणि त्यांचे जीवन यावर आधारित आहे
ही रांगोळी नेहमी पेक्षा अतिशय वेगळ्या पद्धतीने साकारली आहे.
याला आपण भौमितिक रचना चित्र पद्धती , ब्लॉक मेथड, पिक्सल रांगोळी आर्ट किंवा स्क्वेअर रांगोळी पद्धत म्हणू शकतो.
यामधे रांगोळी पाहताना तुम्हाला फक्त लहान लहान चौकोन दिसतील.
विविध रंगांच्या या चौकोनातुन रांगोळीचे वैशिष्ट्य पूर्ण रेखाटन केलेले दिसेल.
ही रांगोळी शक्यतो वरून म्हणजे पहिल्या ,दुसऱ्या मजल्यावरून पाहण्यात खरी मजा आहे.
या रांगोळीचा आकार हा कामगार रोज कामावर जो डबा घेऊन जातात, त्या डब्याचा आहे.
आणि त्या डब्यामधे विषयाची मांडणी केलेली आहे.
हे चौकोन काढण्यासाठी स्वहस्ते बनवलेल्या टूल्स चा वापर केला आहे.
या रांगोळीचा आकार 18 फूट बाय 36 फूट इतका असून सौ. आसावरी धर्माधिकारी यांच्यासह सहा कलाकारांनी मिळून ही रांगोळी साकारली आहे.
या रांगोळीच्या माध्यमातून जागतिक स्तरावर विक्रम नोंद करण्याचा मानस असल्याचं सौ आसावरी धर्माधिकारी यांनी प्रतिक्रिया देतांना म्हटलंय .. ऐकू या या अवलिया कलाकाराची भूमिका यामागची ..
यामधे एकूण ५१००० चौकोन आहेत ..
दिनांक 28 एप्रिल रोजी सकाळी रांगोळी साकारली गेली ..
आणि 28 एप्रिल संध्याकाळ पासून 2 मे पर्यंत सगळ्यांना ही रांगोळी बघता येईल.
नाशिकसह महाराष्ट्रातील कलाप्रेमी आणि रसिकांनी हि भव्य रांगोळी पाहण्यासाठी यावं आणि कलावंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप द्यावी अशी डोळ्याचे पारणे फेडणारी हि अप्रतिम रांगोळी असल्याचे म्हणायला हरकत नाही ..
तरी सर्व कलाप्रेमी नाशिक करांनी जास्तीत जास्त संख्येने ही वैशिष्ठ्य पूर्ण रांगोळी बघण्यासाठी अवश्य यावे असे आवाहन रंगसंगती ग्रुप आणि सिटी सेंटर मॉल यांच्या वतीने करण्यात आले आहे .. आपण आपला अभिप्राय या कलावंतांविषयी नोंदवावा असे आवाहन देखील करण्यात आलंय .. यामुळेच कला क्षेत्रात उत्तुंग भरारी मारू पाहणाऱ्या नवोदित कलाकारांना यातून प्रेरणा मिळेल हे म्हणणे वावगे ठरू नये ..
रांगोळी पाहण्याचा अनुभव घेतला आणि ग्राउंड रिपोर्टींग केलं थेट सिटी सेन्टर मॉलमधून नाशिकचे जिल्हा प्रतिनिधी तेजस पुराणिक यांनी ..
तेजस पुराणिक,जिल्हा प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज नाशिक