नंदुरबार -२१/२/२३
शॉर्ट
1 नंदुरबार नगरपालिके अंतर्गत प्रभाग 14 व 18 मधील सामाजिक सभागृह तयार करण्याचे झाले भूमिपूजन
2 आमदार निधीतून दिले डॉक्टर गावित यांनी 40 लाख निधी
3 आमदार निधी व नगर विकास निधीतून करणार विविध विकास कामे
नंदनगरीत आमदार निधी व नगर विकास निधीतून विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा नुकताच संपन्न झाला
नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध विकास कामांचा सपाटा लावण्यात आला.
यावेळी त्यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं.. येत्या दोन वर्षात नंदुरबार जिल्ह्यात दर्जेदार रस्त्यांचे जाळे निर्माण करणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री डॉक्टर गावित यांनी केलं..
तसंच खासदार डॉक्टर गावित म्हणाल्या की स्थानिक विकास निधीतून माळी समाजाच्या मंगल कार्यालय निर्मितीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल..
तर जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांनी सांगितलं की जिल्हा परिषदेच्या माध्यमातून रस्ते व इतर नागरी विकासासाठी निधी उपलब्ध करून देऊन विकास केला जाईल..
विविध विकास कामात गटार पेवर ब्लॉक बसवणे योगेश्वरी माता मंदिरामागे संरक्षण भिंत बांधणे गटार ड्रेनेज नंदुरबारात अद्यावत जॉगिंग ट्रॅक तयार करणे विद्युत पोल बसवणे, रस्ते इत्यादी विविध विकास कामांचा शुभारंभ भूमिपूजनाच्या माध्यमातून करण्यात आला..
यावेळी व्यासपीठावर माजी आमदार शिरीष चौधरी विजय चौधरी हिरा उद्योग समूहाचे डॉक्टर रवींद्र चौधरी विक्रांत मोरे बांधकाम विभागाचे उपअभियंता बालाजी कांबळे, अभिजीत वळवी यांच्यासह लोकप्रतिनिधी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रवीण चव्हाण नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी एम.डी.टी.व्ही न्यूज नंदुरबार