नंदुरबार :- महात्मा फुले फाउंडेशन नंदुरबारचे जेष्ठ कार्यकर्ते भटू महाले व संजय देवरे यांनी नंदुरबार शहरात महात्मा फुलेंनी सार्वजनिक सत्यधर्मा सांगितल्याप्रमाणे सत्यशोधक पद्धतिने आपल्या मुलांचे लग्न लावून समाजापुढे नवा आदर्श निर्माण केला.
या विवाहाचे वैशिष्ट म्हणजे वधु वरानी एकमेकास कोणत्याही प्रकारच्या मध्यस्थीशिवाय निर्मिकाला साक्षी ठेवून समाजातील गणमान्य व्यक्तिसमोर जाहिररित्या शपथ घेऊन एकमेकास तसेच आपल्या परिवारास समजून घेवून सांभाळ करण्याचे, कोणत्याही प्रकारचे व्यसन न करण्याचे एकमेकास कधीही आणि कोणत्याही परिस्थितित अंतर न देण्याचे, सप्तपदीऐवजी सत्य, प्रेम, विवेक, अहिंसा, श्रम, सदाचार आणि परिवर्तन या सात तत्वांना मानण्याचे वचन घेतले.
धान्याच्या अक्षतांऐवजी फुलांच्या पाकळ्या वधूवरांच्या डोक्यावर टाकल्या गेल्या. पारंपरिक मंगलाष्टकांऐवजी महात्मा फुले यांनी रचलेल्या मंगलाष्टके म्हटले गेले.
मंगलाष्टक संस्कृतऐवजी स्पष्ट आणि सर्वाना समजेल अश्या सोप्या मराठीत लिहिलेल्या आहेत, त्याचे वाचन केले गेले. सत्यशोधक विधिकर्ते भगवान रोकडे यांनी विवाहचे सम्पूर्ण मार्गदर्शन केले.
विवाह सम्पन्न झाल्यावर सभामंडपात वधूवराना विवाहाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. नंदुरबारचे शिक्षणधिकारी सतीश चौधरी, समाजअध्यक्ष आनंदभाऊ माळी, नगरसेवक लक्ष्मण माळी, माजी नगरसेवक निंबा माळी आदींच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी विजय माळी, अधीक्षक श्री.गिरी, समाजबांधव यांच्यासह महात्मा फुले फाउंडेशनचे विकास गवळे, रविंद्र सोनवने, रविंद्र बोरसे आदी विवाहास उपस्थित होते.
एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो नंदुरबार.