नंदुरबार जिल्ह्यात अपघातांची मालिका सुरूच

0
248

खापरला दुचाकीस्वार जखमी तर नवापुरला छोटा हत्तीची वाहनाला धडक

नंदुरबार : अक्कलकुवा तालुक्यातील खापर ते अक्कलकुवा रस्त्यावर वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना घडली आहे. तर नवापूर शहरातील शास्त्री नगर भागात छोटा हत्ती गाडीने धडक दिल्याने चारचाकी वाहनाचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांच्या माहीनुसार, भरुच जिल्ह्यातील झगडीया येथील महेंद्र अशोककुमार मिस्त्री हे दुचाकीने (क्र.जीजे.१६ – डीडी ९०२८) खापर ते अक्कलकुवा रस्त्याने जात होते. यावेळी एका पांढऱ्या रंगाच्या भरधाव वेगातील चारचाकी वाहन चालकाने दुचाकीला धडक दिली. या अपघातात महेंद्र मिस्त्री जखमी झाले. तसेच दुचाकीचेही नुकसान झाले. महेंद्र मिस्त्री यांच्या फिर्यादीवरुन अक्कलकुवा पोलिस ठाण्यात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोना.निलेश वसावे करीत आहेत.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

तर दुसऱ्या एका घटनेत नवापूर शहरातील शास्त्री नगरात छोटा हत्ती वाहनाने धडक दिल्याने चारचाकी वाहनाचे नुकसान झाले आहे. छोटा हत्ती गाडी चालकाने त्याच्या ताब्यातील गाडी (क्र.जीजे.२६ – टी १७७४) भरधाव वेगात एका चारचाकी वाहनाला (क्र.एमएच.०४ – डीएक्स ९९९०) धडक दिल्याने चारचाकी वाहनाने नुकसान झाले. रामअवतार जयस्वाल यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ.दादाभाई वाघ करीत आहेत.
एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो, नंदुरबार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here