Breaking : मुंबई रेल्वे अपघात..

0
305

मुंबई-7/6/23

मुंबईकरांसाठी एक धक्कादायक बातमी समोर येतेय
मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस कडे जाणाऱ्या रुळावर शॉर्टसर्किट झाल्याची घटना घडली
त्यामुळे हार्बर मार्गावरील वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे
जुईनगर आणि नेरूळ स्थानकांच्या दरम्यान सीएसटी कडे जाणाऱ्या रुळावर शॉर्टसर्किट सारखा प्रकार घडलाय
आणि त्यातून काही वेळासाठी मोठी आग लागली

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
मिळालेल्या माहितीनुसार सर्व गाड्या नेरूळमध्येच ठप्प आहेत
त्यामुळे नोकरी आणि व्यवसायासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांचा मोठा गोंधळ उडालाय
मुंबई नगरीतील उपनगरीय लोकल सेवा म्हणजे मुंबई नगरीतील लोकांची लाईफ लाईन..
त्यामुळे लाईफ लाईन जेव्हा काही काळासाठी ठप्प होते तेव्हा चाकरमान्यांचे चांगलेच हाल होतात आणि याचा पदोपदी प्रत्यय येतो तो मुंबईकरांना.. त्यामुळे अशा घटना घडल्यावर प्रशासनानं ताबडतोब कार्यवाही करून कोलमडलेली वाहतूक व्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी तातडीने प्रयत्न करावेत अशी मागणी चाकरमान्यांनी केली
एम डी टी व्ही न्यूज ब्युरो ,मुंबई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here