तळोदा :- शहरातील नेमसुशिल प्राथमिक विद्यामंदिरातील विदयार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. या विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापनाकडून कौतुक करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत पाचवीच्या वर्गासाठी घेण्यात येणारी शिष्यवृत्ती परीक्षेत ४८ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यात १४ विद्यार्थी पात्र झाले असून किंजल भामरे, भूमिका पाटील, दर्शिल मगरे, लक्षित पाटील, वेद पवार, हर्षदा गुरव, युगांत सूर्यवंशी, सिद्धी कर्णकार, महेश पावरा, प्रतीक पाडवी, लतिका सूर्यवंशी, निखिल चव्हाण, प्रतीक जांभोरे, वेदांत माळी या विद्यार्थ्यांनी विशेष यश संपादन केले.
हे सुध्दा वाचा
Good News… राज्यातील सर्व आश्रमशाळांना मिळणार वॉशिंग मशिन | MDTV NEWS
ACB Trap … नंदुरबार पं.स.चे विस्तार अधिकरी जाळ्यात ! | MDTV NEWS
नंदुरबार : पोलीस दलातील पाच अधिकाऱ्यांची बदली… | MDTV NEWS
म्हसावद पोलिसांनी रोखला पिप्राणी येथील बालविवाह ! | MDTV NE
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष निखीलभाई तुरखीया, संचालिका सोनाभाभी तुरखीया, उपाध्यक्ष डी.एम.महाले, सचिव संजय पटेल, समनव्यक हर्षिल तुरखीया, मुख्याध्यापिका पुष्पा बागुल, मुख्याध्यापक गणेश बेलेकर, शिक्षक अरुण कुवर, कमलेश पाटील, सागर मराठे, प्रतिभा गुरव, अश्विनी भोपे, निलिमा वसावे, नितीन भामरे, समाधान मराठे, ईश्वर मराठे आदी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कौतुक केले.
नितीन गरुड. एमडी.टीव्ही. न्युज, तळोदा ग्रामीण.