त्वरित नुकसान भरपाई मिळण्याचे दिले कृषी मंत्रांना आष्टे ग्रामस्थांनी निवेदन..

0
202

नंदुरबार : २३/३/२३

नुकताच नंदुरबार तालुक्यातील आष्टी गावात आणि परिसरात अवकाळी पावसानं थैमान माजवलं होतं.. त्यात विविध पिकांचं नुकसान झालं..

शेतकरी बेचैन झाला..

राहायचं कसं जगायचं कसं

आणि उर्वरित आयुष्य काढायचं कसं यासारखा प्रश्न त्याच्यासमोर उभा राहिला..

नुकतच राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी नंदुरबार जिल्हा दौरा केला..

या दौऱ्यात विशेषता त्यांनी आष्टे ठाणेपाडा आदी गावांना पाहणी केली..

नुकसानग्रस्त भागावर जाऊन पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला.

यावेळी अष्टे जिल्हा परिषद गटातील गावांना अवकाळी पावसाचा फटका बसलेला..

त्या शेतकऱ्यांनी कृषी मंत्र्यांना निवेदन देऊन साकडं घातलं ते त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई मिळण्याचे… शेतीचं सरसकट पंचनामा करून लवकरात लवकर भरपाई मिळवून द्यावी या आशयाचे निवेदन त्यांना देण्यात आलं..

यावेळी कृषीमंत्र्यांसमवेत नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित देखील उपस्थित होते… उपसभापती तथा सदस्य कमलेश महाले यांनी कृषिमंत्र्यांना निवेदन दिल…

यावेळी त्यांच्या समवेत देवेंद्र आघाव नारायण ढोडरे आदी उपस्थित होते..

निवेदन स्वीकारून शेतकऱ्यांना लवकरात लवकर पंचनामे करून भरपाई मिळण्यासाठी आग्रही राहील असा विश्वास कृषीमंत्र्यांनी व्यक्त केला
नारायण ढोडरे ,नंदुरबार तालुका ग्रामीण प्रतिनिधी एम.डी. टी.व्ही न्यूज,नंदुरबार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here