नाशिक -३/४/२३
आडगाव पोलिसांना शिलापूर गाव येथे पेट्रोलिंग दरम्यान एक यामा कंपनीची काळ्या रंगाची दुचाकी व एक काळ्या रंगाची बजाज कंपनीची पल्सर 220cc याच्यामागे पुढे नंबर प्लेट नसल्याने संशयास्पद स्थितीत दिसून आली..
गुन्हे शोध पथकाचे अंमलदार यांनी दुचाकी चालकांना थांबण्यास सांगितलं…
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/36S6BFu
ते तिथून पळून जात असताना उपनिरीक्षक बी एस वाढवणे पोलीस कॉन्स्टेबल दिनेश गुंबाडे निखिल वाघचौरे अमोल देशमुख यांनी दुचाकीचा पाठलाग केला..
संशयित श्रावण भालेराव वय 23 वर्ष नांदूर नाका नाशिक, व दुसरा संशयित सोनू उर्फ अनिल शिंदे वय 21 वर्ष राहणार जेल रोड नाशिक रोड अशी यांची नावे आहेत…
सविस्तर विचारपूस आणि कसोशीने चौकशी केली असता त्यांच्या अंगझेडतीमध्ये एक यामा कंपनीची काळा रंगाची आर 15 मो सा व एक काळ या रंगाची पल्सर दुचाकी तसेच सोन्याचे दागिने आढळून आले … उपनगर व कसारा या परिसरातून त्यांनी दुचाकी चोरी केली होती…
जानोरी गाव तालुका दिंडोरी येथून त्यांनी घरफोडी केल्याची कबुली देखील दिली…
दिंडोरी पोलीस स्टेशन व उपनगर पोलीस स्टेशन येथे दाखल असलेले दोन गुन्हे उघडकीस आणण्यात यश आलं..
पुढील कारवाई कामे उपनगर पोलिसांच्या ताब्यात या संशयीतांना देण्यात आले.. वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भास्कर वाढवणे, सुरेश नरवडे दिनेश गुंबाडे निखिल वाकचौरे अमोल देशमुख आदींनी या पथकात सहभागी होऊन यशस्वी कामगिरी केली..
तेजस पुराणिक, नाशिक प्रतिनिधी,एम डी टी व्ही न्यूज