शहादा,नंदुरबार:४/३/२०२३
कार्यारंभ आदेश देण्याच्या आणि प्रलंबित बिले काढून देण्याच्या मोबदल्यात 43 लाख रुपयांची लाच मागणाऱ्या बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता ला एसीबीने जाळ्यात अडकवलं..
ही धडक कारवाई केली नंदुरबार एसीबी विभागाने..
तीन मार्च रोजी पहाटेपर्यंत सुरू होती कारवाई..
सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा जिल्हा नंदुरबार येथील कार्यकारी अभियंता वर्ग एक महेश प्रतापराव पाटील व 51 वर्ष यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ते मूळ नाशिक येथील फ्लॅट नंबर 203 अष्टविनायक टॉवर थत्ते नगर गंगापूर रोड येथील रहिवासी आहेत..
तक्रारदार खैरवे, तालुका शहादा जिल्हा नंदुरबार येथील रहिवासी असून शासकीय नोंदणीकृत बांधकाम ठेकेदार आहेत. मागील सहा महिने एक वर्षाच्या कालावधीत नंदुरबार जिल्ह्यात प्रमुख जिल्हा मार्ग प्रमुख राज्य मार्ग अशा विविध रस्त्यांच्या डांबरीकरणाची कामे पूर्ण केली आहेत.
तक्रारदार यांच्या तीन नवीन कामांच्या निविदा मंजूर होऊन त्यांचे कार्यारंभ आदेश बांधकाम विभाग धुळे या कार्यालयाकडून कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग शहादा या कार्यालयात आले आहेत..
अद्यापही आदेश आजपर्यंत तक्रारदार यांना प्राप्त झालेले नाहीत..
तक्रारदार यांनी पाटील यांना विनंती केली पाठपुरावा केला.
तर बिले काढण्यासाठी एकत्रित 43 लाख रुपये एवढ्या लाचेच्या रकमेची त्यांनी मागणी केली..
शहादा येथील शासकीय निवासस्थानी तक्रारदार यांच्याकडून पंचांग समक्ष स्वीकारताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आलं.. याप्रकरणी शहादा पोलीस स्टेशन जिल्हा नंदुरबार येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी राकेश चौधरी ,माधवी वाघ विलास पाटील ,विजय ठाकरे, देवराम गावित, अमोल मराठे, ज्योती पाटील, मनोज अहिरे ,जितेंद्र महाले यांनी केली..
श्याम पवार एम.डी.टी.व्ही न्यूज प्रतिनिधी शहादा