ACB Trap … नंदुरबार पं.स.चे विस्तार अधिकरी जाळ्यात !

0
553

विहीर मंजूर करून अनुदान मिळवून देण्यासाठी मागितली ५ हजाराची लाच

नंदुरबार : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत विहीर मंजुरीचा प्रस्ताव मंजूर करून विहिरीच्या अनुदानाची रक्कम मिळवून देण्याकरिता शेतकऱ्याकडून ५ हजाराची लाच स्विकारताना नंदुरबार पंचायत समितीचे विस्तार अधिकारी यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज रंगेहात पकडले. एका चहाच्या टपरीवर पंचासमक्ष हि कारवाई करण्यात आली असून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. दरम्यान, सदर विस्तार अधिकारी यांना येत्या आठवड्यात सहायक गट विकास अधिकारी या पदावर पदोन्नती मिळणार असल्याचे समजते. या कारवाईने पंचायत समिती विभागात खळबळ उडाल्याचे दिसून आले.

हे सुध्दा वाचा

Good News… राज्यातील सर्व आश्रमशाळांना मिळणार वॉशिंग मशिन | MDTV NEWS

फोन पे, गुगल पे, पेटीएम वापरत असाल तर … – MDTV NEWS

म्हसावद पोलिसांनी रोखला पिप्राणी येथील बालविवाह ! | MDTV NEW

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

याबाबत नंदुरबार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार तालुक्यातील रनाळे खुर्द शिवारातील शेतात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत विहीर मंजुरीचा प्रस्ताव मंजूर करून विहिरीच्या अनुदानाची रक्कम तक्रारदार शेतकऱ्यास मिळवून देण्यासाठी नंदुरबार पंचायत समितीचे विस्तार अधिकारी भैय्यासाहेब निकुंभे यांनी तक्रारदार यांच्याकडे १२ जून रोजी ५ हजार रुपये लाचेची मागणी केली होती.

हे सुध्दा वाचा

Good News… राज्यातील सर्व आश्रमशाळांना मिळणार वॉशिंग मशिन | MDTV NEWS

फोन पे, गुगल पे, पेटीएम वापरत असाल तर … – MDTV NEWS

म्हसावद पोलिसांनी रोखला पिप्राणी येथील बालविवाह ! | MDTV NEWS

याबाबत तक्रारदार शेतकऱ्याने नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक समाधान वाघ व त्यांच्या पथकाने सापळा लावला होता. आज दिनांक १९ जून रोजी सदर लाचेची रक्कम पंचायत समिती कार्यालयाबाहेरील चहाच्या टपरीवर स्वीकारताना भैयासाहेब निकुंभे यांना पथकाने रंगेहात पकडले. घटनास्थळी पंचनामा करून निकुंभे यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, सदर विस्तार अधिकारी यांना येत्या आठवड्यात सहायक गट विकास अधिकारी या पदावर पदोन्नती मिळणार असल्याची चर्चा कारवाई नंतर पं.स.आवारात सुरु होती. या कारवाईने मात्र पंचायत समिती विभागात एकच खळबळ उडाली आहे.

हे सुध्दा वाचा

Good News… राज्यातील सर्व आश्रमशाळांना मिळणार वॉशिंग मशिन | MDTV NEWS

फोन पे, गुगल पे, पेटीएम वापरत असाल तर … – MDTV NEWS

म्हसावद पोलिसांनी रोखला पिप्राणी येथील बालविवाह ! | MDTV NEW

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, वाचक पोलीस उप अधीक्षक नरेंद्र पवार, नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक राकेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक समाधान वाघ यांच्यासह पोहवा. विजय ठाकरे, पोहवा.विलास पाटील, पोहवा.ज्योती पाटील, पोना.संदीप नावाडेकर, पोना.देवराम गावित, पोना.मनोज अहिरे , पोना.अमोल मराठे व चापोना.जितेंद्र महाले यांच्या पथकाने केली.

एमडी.टीव्ही. न्युज ब्युरो, नंदुरबार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here