प्रशासकांना हाताशी धरून केली कारवाई : चंद्रकांत रघुवंशी

0
431

जनतेच्या सोयीसाठीच नाट्य मंदिराच्या बाजूला डोमची सुविधा; पालिकेचा होता ठराव

नंदुरबार :- शहरात जी कामे बेकायदेशीर असतील त्यांना दणका दिलीच पाहिजे. काही कामे करताना लोकप्रतिनिधी यांना अडचणी येतात, ते करू शकत नाहीत. मात्र ते काम आयएस दर्जाचे प्रशासक करू शकतात. यासाठीच पुलकित सिंह यांना भेटून अतिक्रमणाच्या मुद्द्यावर चर्चा करून आपल्या स्तरावरून निर्णय घ्यावा, असे सुचवले होते. तर शहरातील नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिराच्या बाजूला डोम तयार करण्याच्या ठराव पालिकेने केला होता. विरोधकांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरून नोटीसा दिल्या असल्याचा आरोप माजी आमदार तथा शिवसेनेचे संपर्कप्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेतून केला.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

नंदुरबार शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरास पालिका प्रशासकांनी सील लावल्याच्या अफवांना पेव फुटले होते. त्यापार्श्वभूमीवर रविवारी श्री. रघुवंशी यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी, माजी उपनगराध्यक्ष कुणाल वसावे, माजी सभापती कैलास पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विक्रमसिंह वळवी आदी उपस्थित होते.

यावेळी चंद्रकांत रघुवंशी म्हणाले की, पालिकेचे प्रशासक पुलकित सिंग यांनी शहराला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. शहरातील अतिक्रमणाच्या विषय त्यांनी योग्य रीतीने हाताळलेला आहे. ज्यांच्या अतिक्रमणामुळे जनतेला त्रास होत असेल ते काढलेच पाहिजे असा ठराव पालिकेने यापूर्वीच तत्कालीन जिल्हाधिकारी मल्लिनाथ कलशेट्टी यांना दिला होता. परंतु, दुर्दैवाने कारवाई झाली नाही. नगरपरिषदेला अल्पकाळासाठी आयएएस अधिकारी प्रशासक म्हणून लाभले. त्यांनी अतिक्रमण मोहीम राबवली. पालिका कर्मचाऱ्यांना शिस्त लावली. कराच्या थकबाकीदारांवर कारवाई केली. याच पद्धतीची कारवाई येणाऱ्या प्रशासकांनी करावी. अतिक्रमणाची मोहीम कायम सुरूच ठेवायला हवी, असे त्यांनी सांगितले.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

शहरात जी कामे बेकायदेशीर असतील त्यांना दणका दिलीच पाहिजे. जे काम लोकप्रतिनिधी करू शकत नाही ते काम प्रशासक करू शकतात. पुलकित सिंह यांना भेटून अतिक्रमणाच्या मुद्द्यावर लक्ष वेधून आपल्या स्तरावरून निर्णय घ्यावा असे सुचवले होते, अशी माहिती माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली. राज्य सरकार जवळ मागणी करणार आहे की नगरपालिकेच्या आयएएस अधिकाऱ्याची प्रशासक म्हणून नियुक्ती देतांना अल्प कालावधी न देता एका वर्षाच्यासाठी द्यावा म्हणजे कारभाराला शिस्त लागेल, असे माजी आमदार श्री रघुवंशी यांनी शेवटी सांगितले.

एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो, नंदुरबार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here