अमरावती -२४/४/२३
शिरपुर येथील रहिवासी आणि महाराष्ट्रातील सुप्रसिध्द साहित्यिक कवि, लेखक, जेष्ठ विचारवंत तथा सिनेअभिनेते तुषार बैसाने यांना अमरावती येथे ‘विदर्भ केसरी भूषण पुरस्कार-२०२३’ या पुरस्काराने अभिनेत्री, कोंबडी पळाली फेम क्रांती रेडेकर यांच्या शुभहस्ते तसेच बळवंतराव वानखडे, आमदार, दर्यापूर, हरिभाऊ पिंपळे, आमदार, मुरतीजापुर यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक २२ एप्रिल रोजी सन्मानित करण्यात आलं ..
तुषार बैसाणे शिरपुर येथील रहिवासी असुन ते सध्या, शाखा प्रबंधक, युनियन बँक ऑफ इंडिया, रनाळे शाखा येथे कार्यरत आहेत.
त्यांची आजवर प्रकाशित पुस्तके आठवण, कविता संग्रह (२००३),प्रेमसागर, कविता संग्रह (२००६) तु नसतांना, कविता संग्रह (२०१२), गजरी, कादंबरी (२०१५), शेतकऱ्यांनो जागे व्हा, अव्हनात्मक चरित्र, (२०१९), असावे कुणीतरी” (२०२२)असून आगामी पुस्तके शापित गांव, हि कादंबरी प्रकाशित होण्याचा मार्गांवर आहे
तसेच त्यांनी “एक ती” या मराठी चित्रपटात मुख्य भुमिका, द किलर हिंदी वेब सिरिज मध्ये महत्वपूर्ण भुमिका, तु क्यू बेवफा हैं! हिंदी अल्बम मध्ये मुख्य भुमिका केली आहे.
त्यांचे आजपर्यंत धुळे, नंदुरबार, जंळगाव, परभणी, लातूर, बीड, अकोला, बुलढाना, अमरावती, मुंबई विद्यापीठ आणि ईतर संस्थाच्या माध्यमातुन २०० च्या वरती परिसंवाद आणि व्याख्याने सुध्दा झाली आहेत.
तुषार बैसाणे यांना आजपर्यंत पन्नास च्या वरती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.
त्यात साहित्य कलायात्री पुरस्कार, साहित्य धारा पुरस्कार, आण्णा साठे पुरस्कार, स्वरांजली पुरस्कार, महाराष्ट्र गौरव पुरस्कार, जीवन गौरव पुरस्कार, शुभम साहित्य पुरस्कार, शुभम अध्यक्षिय पुरस्कार, शिवचरण उज्जैनकर फाऊंडेशन पुरस्कार, शिव साहित्य पुरस्कार, उज्जैनकर साहित्य पुरस्कार, तापी पुर्णा साहित्य पुरस्कार, शुभम वाड:मय पुरस्कार, यशोदिप साहित्य पुरस्कार, उष्कृष्ट साहित्य पुरस्कार, शिव बाल साहित्य संमेलन अध्यक्षिय पुरस्कार, महात्मा फुले साहित्य पुरस्कार, संत रवीदास महाराज पुरस्कार, नारायण दास महाराज साहित्य पुरस्कार, कला दर्पण साहित्य पुरस्कार, काव्यधारा पुरस्कार, साधना संगम साहित्य पुरस्कार, डॉ. शिवचरन उज्जैनकर फांऊडेशन उष्कृष्ट कला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
आजचा विदर्भ केसरी भूषण पुरस्कार” प्रेरणादायी असल्याचे म्हटले आहे. सदर पुरस्कार दिल्या बद्दल आयोजक अमोल कंटाळे आणि अतिष सोसे यांचे त्यांनी आभार मानले आहे..
समाधान पाटील, आसाणे प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज