मोफत आनंदाच्या शिधा – ॲड. राम रघुवंशीच्या हस्ते वाटप

0
156

नंदुरबार -५/४/२३

तालुक्यातील होळ तर्फे हवेली ग्रामपंचायतीच्या वतीने मोफत आनंदाच्या शिधा माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी यांच्या हस्ते मंगळवारी सकाळी वाटप करण्यात आले.

दिवाळी प्रमाणेच गुढीपाडवा व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना शंभर रुपयात आनंदाच्या शिदा देण्याच्या निर्णय शासनाने घेतलेला आहे.

१०० रुपयांत १ किलो रवा, १ किलो चणाडाळ, १ किलो साखर आणि १ लिटर पामतेल देण्यात येणार आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/36S6BFu

जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांचा वाढदिवसाचे औचित्य साधून माजी नगरसेवक रवींद्र पवार मित्र मंडळा तर्फे शुल्क भरून होळ तर्फे हवेली ता.नंदुरबार ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामस्थांना मोफत आनंदाच्या शिदा वाटप करण्यात आला.
कार्यक्रमाचे संयोजन माजी नगरसेवक रवींद्र पवार यांनी केले.

यावेळी माजी पाणीपुरवठा कैलास पाटील,नितीन जगताप,युवासेना तालुका संघटक प्रफुल्ल खैरनार, सरपंच मनीष नाईक,उपसरपंच शोभा पवार, ग्रामपंचायत सदस्य रुपेश जगताप,सरुबाई कोतवाल,बबन कोतवाल,आत्माराम नाईक,सुशीलबाई वळवी,पंचशील शिरसाठ, सोनल कोतवाल,भावना ठाकरे, प्रतिभा मराठे,रत्नप्रभा खैरनार, तुषार पटेल,मितेश वाणी, विजय चौधरी, राहुल जाधव , सागर चित्ते,पुष्कर सूर्यवंशी,राहुल राजपूत,मनोज सूर्यवंशी,पृथ्वीराज राजपूत,धिराज गांगुर्डे,जयेश चौधरी,गोलू सोनार समीर पवार,विकास पवार,भूषण पाटील,विनोद शिरसाठ,विश्वास पाडवी, जिन्या पाडवी, राजू मराठे,जितेंद्र कोतवाल,संजय देसाई,मनीष ठाकरे,एकनाथ कोतवाल,उत्तम ठाकरे आदी उपस्थित होते.

प्रविण चव्हाण एम. डी. टीव्ही न्यूज जिल्हा प्रतिनिधी नंदुरबार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here