नंदुरबार जिल्हा बँड युनियनतर्फे प्रशासनाला निवेदन..

0
132

नंदुरबार -१२/४/२३

सध्या लग्नसराईंसह इतर कार्यक्रमांमध्ये वाद्य वाजवण्यासाठी जाणाऱ्या बँड चालकांच्या वाहनांना आरटीओ आणि पोलीस प्रशासनातर्फे अडविण्यात येत असून कारवाईचा ससेमिरा सुरू आहे.प्रशासनाने बँडसाठी वाहनांना परवाना मंजूर करण्याची मागणी नंदुरबार जिल्हा बँक युनियनतर्फे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
महाराष्ट्र बँक कलाकार उत्कर्ष संघटना पुणे संचलित नंदुरबार जिल्हा बँड युनियनचे जिल्हाध्यक्ष सुनील पवार यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी जिल्हा प्रशासनासह पोलीस विभागाला निवेदन देण्यात आले.
प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी कल्पना निळठुबे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,बँड वादक केवळ दोन ते तीन महिने मोल मजुरी करून परिवाराचे पोट भरतात. परंतु सध्या आरटीओ आणि पोलीस विभागा तर्फे वाहने पकडण्याची मोहीम सुरू आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईनकरा.https://bit.ly/3UoK7E0

नंदुरबार जिल्ह्यात 40 ते 50 हजार कलाकार बँड व्यवसायावर पोट भरत असून कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.
याबाबत प्रशासनाने सहकार्य करण्याची विनंती निवेदनातून करण्यात आली आहे.

निवेदनाची प्रत राज्याचे मुख्यमंत्री आणि सांस्कृतिक मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री यांना देखील देण्यात आली आहे.
निवेदन देण्यासाठी नंदुरबार जिल्हा बँड युनियनचे अध्यक्ष सुनील पवार (प्रकाशा) उपाध्यक्षअमित डामरे (तळोदा) किशोर वळवी, प्रमेश वसावे, विकी ठाकरे, नेहरसिंग नाईक,हरीश पाडवी,अजय गावित, अर्जुन वळवी, योगेश पाडवी, दीपेश भिल,करमसिंग मोरे, गुलाब पाडवी ,अनिल वळवी, मोहन वळवी, धरमसिंग पाडवी, सुरेश वळवी,अशोक गावित, प्रतिक वसावे,आदी उपस्थित होते.

प्रविण चव्हाण एम डी टी व्ही न्यूज जिल्हा प्रतिनिधी नंदुरबार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here