पाटील पवारानंतर आता सुप्रिया सुळेंचा बॅनर झळकलं…

0
119

मुंबई :२३/२/२०२३

जयंत पाटील अजित पवार यांच्यानंतर आता सुप्रिया सुळे यांचेही बॅनर मुंबईत लावण्यात आलं. यावर सुप्रिया सुळे यांचा महाराष्ट्राच्या पहिल्या भावी महिला मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आलाय.

supriya sule
भावी पहिल्या महिला मुख्यमंत्री पदाच्या दावेदाराचे संकेत दाखवणारं बॅनर …

भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री झाला तर हे पद कोणाला मिळण्याचे आतापासूनच चर्चा रंगू लागली आहे.

याचं कारणही तसंच आहे मुंबईतील राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयाबाहेर ठराविक दिवसांच्या अंतराने लागलेले बॅनर..

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील अजित पवार यांच्यानंतर आता खासदार सुप्रिया सुळे यांचेही बॅनर मुंबईत लावण्यात आलं..

पहा हि बातमी सविस्तर ⤵️https://youtu.be/btjIl6P75bM

या पोस्टमुळेच चर्चांना ऊत आलाय..

महत्त्वाचं म्हणजे मुंबईतील राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर काही कार्यकर्त्यांनी हे पोस्टर लावलं होतं.

पण नंतर लगेचच हे पोस्टर काढण्याची माहिती मिळते.
नाद नाय करायचा!
महाराष्ट्राच्या पहिल्या भावी महिला मुख्यमंत्री सौ सुप्रियाताई सुळे, नाद नाय करायचा! असा मजकूर या बॅनरवर लिहिला होता.

तसंच या बॅनरवर सुप्रिया सुळे यांच्यासोबत त्यांचे वडील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचाही फोटो लावण्यात आला आहे.

त्यामुळे ही बॅनरबाजी पोस्टरबाजी बरंच काही सांगून जाते..

आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राज्यात या संदर्भातली पोस्टरबाजी आणि बॅनरबाजी करून नेमकं काय चित्र रंगवायचा आहे

पुढच्या मुख्यमंत्र्यांसंदर्भात हे तर हे पोस्टर बोलक्या पद्धतीने सांगतंय..
दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर अजित पवार यांचं बॅनर झळकलं होतं .. महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री एकच दादा एकच वादा अजित दादा अशा आशयाचा मजकूर त्यावर होता.

आणि आता थेट सुप्रिया सुळेच..
त्यामुळे हे स्पष्ट होतंय की राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आली तर राष्ट्रवादी काँग्रेस कडून मुख्यमंत्री पदासाठी तीन प्रमुख दावेदार रिंगणात असतील.

त्यात अजित पवार, जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे ही प्रमुख नाव मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत असतील. त्यामुळे आगामी काळात नेमकं काय काय होतं आणि काय पोस्टरबाजी होते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल..
ब्युरो रिपोर्ट, एम.डी टी.व्ही न्यूज मुंबई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here