चोपडा,/ जळगाव-२३ /६/२३
चोपडा तालुक्यातील अनुदानित आश्रमशाळा सत्रासेन तालुका चोपडा जिल्हा जळगाव येथे योगदिवस साजरा करण्यात आला.. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना योगदिवसाची माहिती, जीवनातील महत्व व निरोगी राहण्यासाठी आरोग्यदायी लाभ या सर्व गोष्टींचा सविस्तर माहिती उच्च माध्यमिक शिक्षक व योग शिक्षक भालचंद्र पवार, माध्यमिक शिक्षक महेशकुमार शिंदे यांनी योग प्रात्यक्षिकाच्या सादरीकरणातून दिली .. योग साधनेंन अभ्यासात मनन,ग्रहण आणि यश हे त्रिसूत्री साध्य होण्यासाठी किती उपयुक्त आहे हे पटवून दिले .. शाळेतील विद्यार्थ्यांनी देखील तेवढ्याच उत्साहाने सहभाग नोंदवत योगप्रात्यक्षिक केले ..
हे सुध्दा वाचा
Good News… राज्यातील सर्व आश्रमशाळांना मिळणार वॉशिंग मशिन | MDTV NEWS
नंदुरबार : पोलीस दलातील पाच अधिकाऱ्यांची बदली…
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
त्यावेळी संस्थेचे सचिव ज्ञानेश्वर भादले, सत्रासेन आश्रमशाळा माध्यमिक मुख्याध्यापिका, सत्रासेन गावातील लोकनियुक्त सरपंच,वंदना भादले, प्राथमिक मुख्याध्यापक जगदिश महाजन, तसेच उच्च माध्यमिक शिक्षक नरेंद्र देसले, मनोज पाटील, योगेश पाटील, झुलाल कंरकाळ, गजानन पाटील, माध्यमिक शिक्षक संजय शिरसाळे, कैलास महाजन,अधिक भादले, प्राथमिक शिक्षक उदय वानखेडे, विकास कोळी,योगेश पाटील, अनिल राणे, मनोज महाजन,शितल पाटील, नरेंद्र महाजन आदी उपस्थित होते सदर कार्यक्रमास यशस्वितेसाठी सर्व कर्मचारी यांनी मेहनत घेतली.. तसेच संस्थेचे अध्यक्ष रविंद्र भादले व संस्थेचे उपाध्यक्ष धनंजय भादले यांनी योगदिनाबद्दल शुभेच्छा दिल्या.
आत्माराम पाटील,चोपडा प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज ..