मुंबईत अग्नी तांडव गरिबांच्या झोपड्या जळून खाक.. 14 वर्षाच्या मुलाचा मृत्यू..

0
147

मुंबई:१३/०२/२०२३

मुंबईतील मालाड परिसरातील दिंडोशी येथील पालक नगर मध्ये नुकतीच आज सकाळी भीषण आग लागली.

या आगीत एका 14 वर्षे मुलाचा मृत्यू झाला असून 50 पेक्षा झोपड्या जळून खाक झाल्याची माहिती आहे. आग आटोक्यात आली असली तरी मोठ्या प्रमाणात गरिबांचं नुकसान झालंय. भीषण आग लागल्यानंतर बघता बघता काही क्षणात आगीन रौद्ररूप धारण केलं.


पश्चिम उपनगरातील मालाड पूर्वकडील आंबेडकर नगर या वनजमिनीवरील असलेल्या झोपडपट्टीला सकाळी 11 वाजेच्या दरम्यान भीषण आग लागली. या गीत 14 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून 15 सिलेंडरचा स्फोट झाल्याची माहिती मिळाली. आगीत दहा ते पंधरा झोपडीधारक जखमी झाले तर 50 पेक्षा अधिक झोपड्या जळून खाक झाल्या आहेत.

घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. यामुळे मुंबईतील वन जमिनीवरील झोपड्यांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे आता शिंदे -फडणवीस सरकारकडून पुनर्वसन होईल का? हे पाहणे महत्वाचे ठरेलं..

मुंबईहून एमडीटीव्ही न्यूज ब्युरो

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here