कृषी उत्पन्न बाजार समिती दोंडाईचा :सभापतीपदी नारायण पाटील तर उपसभापती रमेश खैरनार यांची बिनविरोध निवड.

0
356

धुळे -२७/५/२३

दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली
आमदार जयकुमार रावल यांचे नेतृत्वात सदर या ठिकाणी भाजपचा झेंडा रोवला
आज दिनांक 26 मे 2023 रोजी सकाळी अकरा वाजता दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीची सभापती उपसभापती निवडणूक प्रक्रिया पार पडली
तर या वेळेस निवडणूक अधिकारी म्हणून मनोज चौधरी सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून शेखर साडी गिरीश महाजन अमोल इंडिया यांनी कामकाज पाहिले
या वेळेस सभापती पदासाठी नारायण बाजीराव पाटील यांना जिजाबराव गोरख पाटील हे सूचक होते.तर नारायण बाजीराव पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांना सभापतीपदी घोषित करण्यात आले

संपूर्ण खान्देशातील चर्चेत असलेल्या दोंडाईचा बाजार समितीच्या निवडणुकीत एकिकडे आ.जयकुमार रावल आणि दुसरीकडे कॉग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना असे सर्वच पक्ष एकत्र आले होते, पंरतू तालुक्यातील मतदारांनी आ.जयकुमार रावल यांच्या पॅनलला 70 टक्के तर विरोधी 6 नेत्यांच्या संयुक्त पॅनलला केवळ 30 टक्के देवून सर्वच्या सर्व 18 जागांवर आ.रावल यांच्या पॅनलचा दणक्यात विजय मिळवून दिला होता, त्यानंतर आज सभापती आणि उपसभापती पदासाठी सकाळी विशेष सभा घेण्यात आली

निवडीनंतर आ. जयकुमार रावल यांनी नवनिर्वाचित सभापती आणि उपसभापतींचा सत्कार केला.

त्यानंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी ढोल –ताशा आणि डी.जे.च्या तालावर आनंदोत्सव साजरा केला. बाजार समितीच्या मुख्य कार्यालयात जल्लोष साजरा केल्यानंतर बाजार समिती कार्यालय ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयाला अभिवादन करून मिरवणुक रावल गढीपर्यत काढण्यात आली याठिकाणी आ.जयकुमार रावल यांच्यासह कार्यकर्त्यांनी ठेका धरत आनंदोत्सव साजरा केला.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
तर उपसभापती पदासाठी रमेश गंगाराम खैरनार यांना किशोर रंगराव पाटील हे सूचक होते,
यावेळी उपसभापती पदी रमेश गंगाराम खैरनार यांचा देखील एकमेव अर्ज आल्याने उपसभापती पदासाठी रमेश खैरनार यांची निवड करण्यात आली.

यावेळी आमदार जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत सभापती नारायण पाटील ,उपसभापती रमेश खैरनार यांची निवड प्रक्रिया पार पडली.
सभापती महावीरसिंह रावल, मा. उपाध्यक्ष कामराज भाऊसाहेब निकम, महेंद्रसिंग गिरासे,पंकज कदम, मंगळे रावसाहेब,रवींद्र उपाध्ये, उपस्थितीत सदर निवडणूक प्रक्रिया पार पडली
संचालक मंडळ किशोर पाटील,प्रमोद पवार,जिजाबराव पाटील, जयसिंग गिरासे,दगडू गिरासे,मोतीलाल वाकडे,वैशाली पवार,स्नेहल बागल,साहेबराव धनगर पेंढारकर,संजय ठाकरे,दीपक बोरसे, दादाभाऊ सोनवणे,आत्माराम पाटील, राहुल जैन,रोशन टाटिया,एकनाथ नाईक,आदि सर्व संचालक मंडळ या ठिकाणी उपस्थित होते.

जि.प.सदस्य पंकज कदम, डी.आर.पाटील, धनजंय मंगळे, विरेंद्रसिंग गिरासे, निखील जाधव, रवि उपाध्ये, नबु पिंजारी, नरेंद्र गिरासे, राजू धनगर, चिरंजीवी चौधरी, रणजित गिरासे, भारत ईशी, कुलदिप गिरासे, जितेंद्र गिरासे, डॉ.नितीन चौधरी अनिल सिसोदिया, पं.स.सदस्य दिपक मोरे, रामनाथ मालचे, भरतरी ठाकूर, कृष्णा नगराळे, संदीप धनगर, पंकज चौधरी, मनोज निकम, भिकन बागवान, महेंद्र कोळी , पप्पु धनगर, साहेबराव पवार, यांच्यासह शेकडो भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.
यादवराव सावंत ,शिंदखेडा प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज ..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here