नंदुरबार :- तालुक्यातील भालेर परिसरातील गावांमध्ये कृषी विभागामार्फत माती परीक्षण करण्यात येऊन मातीच्या पोत नुसार खते व इतर आवश्यक घटकांबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राकेश वाणी, उपविभागीय कृषी अधिकारी सी.के. ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली भालेर येथे कृषी विभागाच्या विविध योजना विषयी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी कृषी पर्यवेक्षक सुधीर पाटील कृषी सहाय्यक जितेंद्र धगधगे तसेच ग्रामस्थ शेतकरी उपस्थित होते. यावेळी महाडीबीटी ऑनलाईन फॉर्म भरणे, माती नमुना काढणे आदी उपक्रम राबविण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
भालेर परिसरातील नगाव, तीसी, भादवड, आक्राळे, वडबारे, बलदाने, कार्ली, निंभेल, कड्रे, खोक्राळे, रनाळे आदी गावातून प्रत्येकी दोनशे माती नमुने काढण्यात येणार असून यातून शेतकऱ्यांना खताच्या मात्रा, जमिनीत आवश्यक घटकाही कमतरताआहे हे समजून येणार आहे. संतुलित खतांचा वापर करण्यास मदत होणार आहे. या कार्यक्रमाला भालेर येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो, नंदुरबार.