AGRICULTURE NEWS:इ -पीक पाहणीसाठी अधिकारी पोहोचले बांधावर ..

0
171

शिंदखेडा /धुळे १८/७/२३

येथील तलाठी तुषार पवार थेट शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पीक पाहणी बाबत जनजागृती करतांना शेताच्या बांधावर पोहोचले .. शेतात उपविभागीय अधिकारी प्रमोद भामरे यांच्या आदेशानुसार आणि तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांसोबत प्रत्यक्ष इ पीक पाहणी बाबत मार्गदर्शन व संवाद साधला. पीक पाहणी नोंदणीसाठी ई- पीक पद्धतीने ॲप महसूल विभागाच्या वतीने विकसित केले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना आता पीक पाहणी नोंदणी करता येणार आहे.

WhatsApp वर मिळवा ब्रेकिंगन्यूज, जॉबअपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

हे हि वाचा :

Breaking : घरकुल घोटाळ्यातील आरोपींवर कधी होणार कारवाई?..

MLA SATYAJIT TAMBE:नादुरुस्त जि. प. शाळा दुरुस्तीच्या प्रतीक्षेत? आमदार तांबेनी घेतली वृत्ताची दखल…

NASHIK :शासन आपल्या दारी कार्यक्रमाचा नाशकात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ संपन्न ..

ई- पीक पाहणी खरीप हंगाम 1जुलै 2023 पासून सुरु करण्यात आली आहे. यंदाच्या खरीप हंगामात पीक पाहणी नोंदणी साठी ई- पीक पाहणीचे 2.0.11 हे अपडेटेड व्हर्जन मोबाईल मध्ये डाऊनलोड करावे लागणार आहे. ते अपडेट करणे आवश्यक आहे. खरीप हंगामाच्या प्रत्यक्ष ई- पीक पाहणी मोबाईल अँप द्वारे पीक पाहणी साठी 1जुलै 2023 पासून सुरु झाली असुन शेतकऱ्यांना पीकपेरा नोंदविण्याची संधी उपलब्ध झाली आहे.सदरील मोबाईल अँप द्वारे शेतकरी पिकांच्या नोदी , बांधावरच्या झाडांची नोंदी, अक्षांश व रेखांश सह अन्य बाबी नोंदविण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. म्हणून आज शिंदखेडा येथील तलाठी तुषार पवार यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन शेतकऱ्यांना मोबाईल अँप द्वारे नोंदी कशा पद्धतीने कराव्यात याचे प्रात्यक्षिक करून दाखविले तसेच मार्गदर्शन देखील केले. त्यावर काही शेतकऱ्यांनी विचारलेल्या शंकाचे जागेवरच निरसन केल्यावर शेतकर्‍यांचे समाधान झाले. हयावेळी विस्तृत माहिती व प्रात्यक्षिक सोप्या पद्धतीने करुन दिल्याबद्दल शेतकऱ्यांनी तलाठी तुषार पवार यांचे आभार मानले.
यादवराव सावंत ,प्रतिनिधी ,शिंदखेडा,एम डी टी व्ही न्यूज धुळे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here