AHMADNAGAR CRIME:खळबळ..तक्रारदार महिलेवर पोलिसाकडूनच अत्याचार..

0
197

अहमदनगर -२१/७/२३

अहमदनगरमधून एक हादरवणारी घटना समोर आली आहे. पोलीस हे सामान्य माणसांचं रक्षण करतात, असंच सगळे मानतात. मात्र आता समोर आलेली घटना अक्षरशः हादरवून टाकणारी आहे. घटनेत पोलीस उपनिरीक्षकानेच एका महिलेवर अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथे ही घटना घडली.

याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकावरच बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. राहुरी पोलीस स्टेशनच्या उपनिरीक्षकावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक सज्जनकुमार नाऱ्हेडा असं आरोपीचं नाव आहे. या प्रकरणातील आरोपी सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

काय आहे प्रकरण?

जमीन खरेदीत फसवणूक झाल्याप्रकरणी महिलेनं पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. मात्र या प्रकरणाचं तपास काम सुरू असतानाच सज्जनकुमार नाऱ्हेडा याने अनेकदा त्रास दिल्याचा आरोप महिलेनं केला आहे. तू खुप छान दिसते , माझ्याशी मैत्री कर, असे मेसेज आरोपी महिलेला पाठवत असे.

इतकंच नाही तर त्याने घरी येऊन मुलासमोर महिलेला अत्याचार करण्याची धमकी दिली. महिलेला स्वतःच्या रूमवर नेलं आणि रूमवर नेत तिच्यावर जबरदस्ती केली, अशी माहिती पीडित महिलेनं दिली आहे. राहुरी तालुक्यातील महिलेच्या फिर्यादीवरून कलम 376 क (ब) , कलम 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणातील आरोपी सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मात्र, पोलिसानेच महिलेवर अत्याचार केल्याने खळबळ उडाली आहे.

अहमदनगर एम डी टी व्ही न्यूज ब्युरो …

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here