अजितदादा पवार नंदुरबारात … मेळाव्यात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना करणार मार्गदर्शन

0
1145

विधानसभेचे विरोधीपक्ष नेते अजितदादा पवार हे उद्या गुरुवारी नंदुरबार येथे येत आहेत. जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित मेळाव्यात ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील. सध्याच्या राजकीय परिस्थीवर अजितदादा काय भाष्य करतात याकडे जिल्हावासियांचे लक्ष असणार आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

नंदुरबार येथील व्ही.जी.लॉन्स मध्ये दुपारी १ वाजता राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळावा होणार आहे. जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे यांनी या मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्यासाठी विधानसभेचे विरोधीपक्ष नेते अजित दादा पवार हे उपस्थित राहणार असून ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील.

हे सुध्दा वाचा

उत्तर महाराष्ट्रात ऊन सावल्यांचा खेळ…. मुंबईत हलक्या सरी ! – MDTV NEWS

नंदुरबारात ९ वर्षात विकासाला गती : कोट्यवधींची कामे – MDTV NEWS

शिरपूर तालुका पोलीस : अवैध मद्य वाहतूक करणारे वाहन ताब्यात .. – MDTV NEW

या मेळाव्यासाठी अजितदादा पवार हे उद्या गुरुवारी सकाळी ८ .२३ वाजता खान्देश एक्सप्रेसने नंदुरबार येथे येतील. ८.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत शासकीय विश्रामगृह येथे राखीव वेळ असून दुपारी १ वाजता व्ही.जी.लॉन्स येथील मेळाव्याच्या ठिकाणी त्यांचे आगमन होईल. ४.३० वाजता जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे यांच्या निवासस्थानी उदयन पॅलेस व त्यानंतर ५.२० वाजता अजित पवार हे दोंडाईचाकडे प्रयाण करतील. सायंकाळी ६ वाजता दोंडाईचा येथील केशरानंद मैदान येथे आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहतील.

एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो नंदुरबार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here