अजित पवार आणि जयंत पाटलांच्या हस्ते कु.हर्षदा देसलेच्या पालकांचा जाहीर सत्कार..

0
260

शिंदखेडा /धुळे :17/6/23

इयत्ता दहावी बारावीच्या परीक्षांमध्ये यश मिळवणारे तर अनेक आहेत मात्र प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्यांची संख्या बोटावर मोजण्या इतकीच..
कृषी उपसंचालक वर्ग एक पदी निवड झालेल्या हर्षदा सुनील देसले या शिंदखेड्याच्या कन्येच्या मातापित्यांचा नुकताच जाहीर सत्कार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून करण्यात आला
मुलीनं यश जरी मिळवलं असलं तरी त्या मुलीच्या यशाचा आनंद पालकांच्या गगनात मावेनासा झालेला असतो
कारण आई-वडिलांनी केलेल्या कष्टाचं चीज जेव्हा मुलं करतात तेव्हा तेव्हा तो आनंद पालकांच्या आनंद अश्रुतून कोसळत असतो
कृषी उपसंचालक वर्ग एक पदी निवड झालेल्या कुमारी हर्षदा देसले न महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादित करत शिंदखेडा शहराचे नाव यशाच्या आलेखात उंचावलं आहे

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
तिच्या मातापित्यांचा जाहीर सत्कार दोंडाईचा येथील केशरानंद नगरात नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शेतकरी मेळाव्यात करण्यात आला
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि विरोधी पक्ष नेता अजित पवार यांच्या हस्ते त्यांचा सत्कार पार पडला
वडील सुनील देसले आणि आई प्रतिभा देसले यांनी हा सन्मान स्वीकारला
कुमारी हर्षदा च्या यशाबद्दल अजित पवार यांनी तोंड भरून कौतुक केलं

हे सुध्दा वाचा

“बिपरजाॅय”… नंदुरबारला धोका नाही …! – MDTV NEWS

फोन पे, गुगल पे, पेटीएम वापरत असाल तर … – MDTV NEWS

मंत्रिमंडळ निर्णय : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी १५०० कोटी रुपयांस मंजुरी –


यावेळी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री नामदार छगन भुजबळ, माजी मंत्री डॉक्टर हेमंत देशमुख, निरीक्षक अर्जुन टीळे, जिल्हाध्यक्ष सुरेश सोनवणे, माजी जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष ज्ञानेश्वर भामरे, शिवराज भामरे रविराज भामरे, मिलिंद देसले यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते..
वडील शेतमजुरी करून परिवाराचा उदरनिर्वाह चालवत
1989 मध्ये स्वतःच संजय सायकल मार्ट या नावाने व्यवसाय त्यांनी सुरू केला आणि आजही करीत आहे
लहानपणापासूनच हुशार असलेल्या हर्षदाच पहिली ते चौथीपर्यंत शिक्षण किसान हायस्कूल मध्ये झालेलं..
इयत्ता पाचवी ते दहावी माध्यमिक शिक्षण गर्ल्स हायस्कूल शिंदखेडा तर इयत्ता अकरावी बारावी एम एच एस एस महाविद्यालय या ठिकाणी पूर्ण केले
यानंतर कृषी विद्यालय धुळे येथे बीएससी चे शिक्षण पूर्ण करून कृषी विद्यापीठ राहुरी येथे एमएससी पूर्ण करून तिने सुवर्णपदक पटकावलं
त्यानंतर तिने स्पर्धा परीक्षेची तयारी केली आणि त्यात अखेर तिला यश आल
यामुळे संपूर्ण शिंदखेडा शहरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतो
यादवराव सावंत, शिंदखेडा प्रतिनिधी, एम डी टी व्ही न्यूज..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here