Ajit Pawar म्हणाले … पवार साहेबांसह कुटुंबातील सर्वांची भेट घेतली, बोललो… !

0
286

माझं अंतर्मन म्हणालं, आपण सिल्वर ओकवर गेलं पाहिजे, म्हणून गेलो. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी, कुटुंब कुटुंबांच्या ठिकाणी आहे. सर्वांची भेट घेतली, बोललो.”, असं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सिल्वर ओक येथील भेटीवर दिलं आहे. राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार सिल्वर ओकवर गेले. तब्बल अर्धा तास अजित पवार सिल्वर ओकवर होते. अजित पवारांचं सिल्वर ओकवर जाणं, त्यावेळी शरद पवारही उपस्थित असणं, याची राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा रंगली होती.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

नाशिक येथील शासन आपल्या दारी कार्यक्रम निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार हे नाशिकमध्ये आले होते. यावेळी शासकीय विश्रामगृहात अजितदादा यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी सिल्वर ओकवर जाऊन पवार कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी काय घडलं? याबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिलं. ते म्हणाले की, काल काकीचं (प्रतिभा पवार) ऑपरेशन झालं, मला दुपारीच जायचं होतं, पण जाता आलं नाही. दुपारी सुप्रियाशी बोललो, त्यानंतर मंत्रालयातील कामे आटोपल्यांनंतर सिल्व्हर ओकला गेल्याचे अजित पवार म्हणाले.

हे सुध्दा वाचा

Nandurbar News.. धूम स्टाईलने सोन्याची चैन पळणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या… १३ गुन्हे उघड | MDTV NEWS

धमनार परिसरात बिबट्याची दहशत.. गोऱ्हावर हल्ला करत केले ठार | MDTV NEWS

कजगाव बंद… सरपंचच उतरले रस्त्यावर; गावकऱ्यांचा रास्तारोको ! | MDTV NEWS

तळोदा, अक्कलकुव्यात मुसळधार .. शेतीसह अनेक घरांमध्ये शिरले पाणी | MDTV NEW

“काल दिवसभर अनेक कामांमुळे दुपारी सिल्वर ओकवर (Silver Oke) जायला जमले नाही, रात्री उशिरा गेलो. माझं अंतर्मन म्हणालं, आपण सिल्वर ओकवर गेलं पाहिजे, म्हणून गेलो. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी, कुटुंब कुटुंबांच्या ठिकाणी आहे. सर्वांची भेट घेतली, बोललो.”, असं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सिल्वर ओक येथील भेटीवर दिलं आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

अजित पवार यावेळी म्हणाले की, काल काकींच ऑपरेशन झालं, त्यांच्या हाताला दुखापत झाल्यामुळे काल भेट घेणार होतो. मात्र खाते वाटपाचा निर्णय होत असल्याने मंत्रालयात, विधानभवनात होतो. काम झाल्यावर मी देखील सिल्वर ओक गेलो. त्यामुळे राजकारण राजकारणाच्या ठिकाणी आहे आणि कुटुंब कुटुंबाच्या ठिकाणी आहे. आपली भारतीय संस्कृती असून परिवाराला आपण पहिल्यांदा महत्त्व देतो. सिल्वर ओकवर अर्धा तास थांबलो. सर्वांशी भेट घेतली. माझ्या अंतर्मनांन सांगितलं की तिथं गेल पाहिजे, म्हणून मी गेलो, शरद पवार (Sharad Pawar) साहेब तिथं होते, असेही ते म्हणाले.

हे सुध्दा वाचा

Nandurbar News.. धूम स्टाईलने सोन्याची चैन पळणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या… १३ गुन्हे उघड | MDTV NEWS

धमनार परिसरात बिबट्याची दहशत.. गोऱ्हावर हल्ला करत केले ठार | MDTV NEWS

कजगाव बंद… सरपंचच उतरले रस्त्यावर; गावकऱ्यांचा रास्तारोको ! | MDTV NEWS

तळोदा, अक्कलकुव्यात मुसळधार .. शेतीसह अनेक घरांमध्ये शिरले पाणी | MDTV NEW

शरद पवार यांचीही भेट घेतली….

शरद पवार साहेबांना भेटलो, कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. शरद पवारांनी शिक्षण विभागाला शाळा व्यवस्थेबद्दल पत्र दिले, या संदर्भात चर्चा केली. याबाबत शिक्षण विभागाला कळविण्यात आले असून लवकरच याबाबतची माहिती मिळणार आहे. त्यानुसार प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणात काय अडचण येतात? या समजून घेतल्या जाणार आहेत. त्यानुसार पुढची कारवाई केली जाईल असेही अजित पवार यावेळी म्हणाले.

एमडी.टीव्ही. न्युज ब्युरो, मुंबई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here