अग्निशस्त्र दोन धारदार लोखंडी तलवार बाळगणारी टोळी अखेर जेरबंद..
अकोला : 17/7/23
स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार अकोला शहरात समु राजपूत राहणार खोलश्वर अकोला हा बेकायदेशीर रित्या अग्नि शस्त्र आणि तलवार विक्री करीत आहे.. या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले.. सखोल चौकशी केली असता त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली देत दोन अग्निशास्त्र एक पिस्तूल रिवाल्वर दोन लोखंडी धारदार तलवार हरी झाडे राहणार गौरक्षण रोड अकोला आणि आकाश आसोलकर राहणार उमरी अकोला यांना विकल्याची कबूल दिली.. त्या आरोपीकडून हा सर्व बेकायदेशीर शस्त्रसाठा पोलिसांनी जप्त केला. एकूण एक लाख 13 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय. सदर आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन सिव्हिल लाईन व पोलीस स्टेशन खदान येथे कलम 3/25,4/5 आर्म्स ऍक्ट प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.
WhatsApp वर मिळवा ब्रेकिंगन्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईनकरा. https://bit.ly/3UoK7E0
हे हि वाचा : Breaking : घरकुल घोटाळ्यातील आरोपींवर कधी होणार कारवाई?..
MLA SATYAJIT TAMBE:नादुरुस्त जि. प. शाळा दुरुस्तीच्या प्रतीक्षेत? आमदार तांबेनी घेतली वृत्ताची दखल…
पुढील तपास सुरू आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक अकोला संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे , उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष दुधगावकर, पोलीस निरीक्षक प्रदीप शिरस्कार, स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव, सहाय्यक फौजदार दशरथ बोरकर, राजपाल ठाकूर गणेश पांडे, पोलीस हवालदार फिरोज खान गोकुळ चव्हाण भास्कर धोत्रे, पोलीस कॉन्स्टेबल आकाश मानकर अभिषेक पाठक धीरज वानखेडे, यांच्यासह पोलीस कॉन्स्टेबल स्वप्निल खेडकर यांचा समावेश होता..
अशोक भोकरे, अकोला प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज ,अकोला