अकोला / १० एप्रिल २०२३
अकोला जिल्ह्यातील पारस गावातील बाबुजी महाराज संस्थेच्या आवारातील झाडावर वीज कोसळल्यानं 7 लोकांचा मृत्यू झालाय तर 29 जण जखमी झालेत.
त्यातील 5 जण गंभीर जखमी आहेत. मंदिर परिसरात पत्र्याची शेड बांधण्यात आली होती.
या शेडच्या मध्यभागी निंबाचं मोठं झाड होतं. या झाडावर वीज कोसळल्यानं हा संपूर्ण शेड जमीनदोस्त झाली.
यामुळे शेडखाली उभ्या असलेल्या 7 जणांचा मृत्यू झाला तर 29 जण जखमी झालेत.
या घटनेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दु:ख व्यक्त केलंय. अकोल्यातील दुर्घटना वेदनादायी असल्याचं त्यांनी म्हटलंय.
तसंच जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक जखमींवर वेळेत उपचार व्हावेत यासाठी समन्वय साधून असल्याची माहिती त्यांनी दिलीय.
जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून किरकोळ जखमींवर बाळापूर येथे उपचार करण्यात येतायत.
मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकार तसंच मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतल्याची माहितीही फडणवीसांनी दिलीय.
आता WhatsApp वरमिळवाब्रेकिंगन्यूज, जॉबअपडेट्सआणिमहत्वपूर्णमाहिती! त्यासाठीक्लिककराआणिजॉईनकरा. https://bit.ly/36S6BFu
काही भाविक ठार तर अनेक जखमी झाल्याचे वृत्त कळताच शिवसेना जिल्हाप्रमुख अश्विन नवले, उपजिल्हाप्रमुख शशिकांत चोपडे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष ,पश्चिम विदर्भ संपर्क प्रमुख राजु भोर ,शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष लोकसभा समन्वयक नागेश इंगोले ,यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धाव घेत जखमींना तातडीने सर्वोपचार मिळावा
तसेच आवश्यक ती मदत करण्यासाठी शासन तत्पर असुन हवी ती मदत करण्यासाठी तयार असल्याचे सांगितले..
अशोक भाकरे, प्रतिनिधी अकोला,एम डी.टी.व्ही .न्युज