AKOLA :मोरगाववासियांना मिळेना हक्काची वाट ..

0
536

मोरगाव/अकोला -२४/७/२३

मोरगाव परिसरात मुसळधार पावसाने कहर माजविला आहे .. परिणामी शेतकऱ्यांच्या कापुस ,सोयाबीन, पिकाला जोरदार फटका बसला आहे .. मुसळधार पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत असुन गावालगतच्या नाल्याला तलावाचे स्वरुप प्राप्त झाल्याची बाब समोर आली आहे .. त्याचप्रमाणे लगतच असलेल्या नाल्याला मोठा पुर आल्या मुळे डांबरीकरण रोड एका बाजूने पूर्णपणे खचला असून मोठा खड्डा पडला आहे.. या रस्त्याने ग्रामस्थांचे जाणे -येणे मोठ्या प्रमाणात चालु असते..

WhatsApp वर मिळवा ब्रेकिंगन्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईनकरा. https://bit.ly/3UoK7E0

या रस्त्याने शाळेतील मुलांना व गावातील नागरिकाना एकाच रस्त्याने जावे लागते.. त्यामुळे या रस्त्याने जीवित हानी होण्याची शक्यता आहे .. या रस्त्याचे व खड्ड्याचे काम त्वरित गट ग्रामपंचायत ने पूर्णपणे लक्ष देऊन कामाचे नियोजन करावे व तसेच मोरगाव भाकरे येथील पूल पाण्याखाली गेला असल्याने हक्काची वाट काढता यावी म्हणून लवकरात लवकर पूल तयार करावा .. गावातील जनतेला अनेक समस्यांना तोंड देण्याची पाळी आली आहे.. याठिकाणी शासनाने मोठा पूल मंजूर करावा व तसेच रोडच्या बाजूला खड्डा पडला आहे हा लवकर दुरुस्ती करण्यात यावा व तसेच शासनाने याकडे लक्ष केंद्रित करून येथील नागरिकांना दिलासा देण्यात यावा अशीही मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे
प्रतिनिधी ,अशोक भाकरे अकोला, एम डी.टी.व्ही.न्युज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here