AKOT CRIME:मोटर सायकल चोरी करणारी टोळी जेरबंद..अकोट ग्रामीण पोलिसांची कार्यवाही..

0
329

अकोट /अकोला -२१/७/२३

अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन येथे फिर्यादी नामे विजय शहादेव कसुरकार यांनी पो.स्टे.येथे जबानी रिपोर्ट दिला की त्यांची ग्राम बोर्डी आठवडी बाजार येथील बाजार जवळ उभी असलेली बजाज बाॅक्सर गाडी ही आठवडी बाजार ग्राम बोर्डी ता.अकोट येथून कोणीतरी अज्ञात चोरट्यांने चोरून नेली आहे
रिपोर्ट वरून पो.स्टे.ला. कलम 379 भादवि चा गुन्हा दाखल करून तपासात घेतला .. सदर गुन्ह्याचा तपास मा.उपविभागीय पोलीस अधिकारी रितु खोखर मॅडम व  मा.सुरज गुंजाळ परि.सहायक पोलीस अधीक्षक प्रभारी ठाणेदार पो.स्टे.अकोट ग्रामीण याचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार उमेशचंद्र सोळंके तसेच पोउपनि विजय पंचबुधे,सपोउपनि दादाराव निखार,पोहेका विलास मिसाळ  पोहेका हरिष सोनोने ,नापोका योगेश जऊळकर,पोका उमेश दुतोंडे,पोका सागर नागे यांनी सदर गुन्ह्यातील आरोपी यांचा तपासातून कसून शोध घेतला ..

WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
आरोपी यांनी चोरून नेले्ली मोटर सायकल बजाज बाॅक्सर ही गाडी 12 तासाच्या आत हस्तगत केली.
सदर तपासात असे निष्पन्न झाले की ही एक सराईत गुन्हा करणार्‍यांची टोळी आहे.या गुन्ह्य़ामध्ये एकुण 3 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले.या आरोपींनी ईतर गुन्ह्यात चोरलेल्या गाड्यांची कबुली देताच पोलिसांनी पुढील शोधमोहीम हाती घेऊन तब्बल 16 दोनचाकी गाड्या व एका गाडीचे सुटे इंजिन आणि इतर पार्ट हस्तगत केले.या धडाकेबाज कारवाई मुळे अकोट ग्रामीण पोलिस स्टेशन मधील 4 प्रलंबित गुन्हे उघडकीस आले असुन अनेक पोलिस स्टेशनला त्यांच्या गुन्हामध्ये महत्त्वाची लीड मिळाली आहे.या मध्ये ग्राम बोर्डी येथील नागास्वामी मंदिरातील दानपेटी फोडून चोरुन नेलेल्या पैशांची देखील जप्ती करण्यात आली.सदरच्या कारवाईमुळे पोलिसांमधील सराईत गुन्हेगारांच्या विरोधात लढण्याच्या क्षमतेचे उत्तम असे प्रदर्शन झाले.यामुळे पुढील काळात चोरटय़ांची कसलीही गय केली जाणार नाही असा स्पष्ट संदेश जनतेत पोहोचला आहे.सदरच्या कार्यवाही मध्ये .पोलीस अधीक्षक संदीप घुगे ,मा अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले.

अशोक भोकरे ,प्रतिनिधी ,अकोला एम डी टी व्ही न्यूज..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here