आठवडी बाजारात सर्वत्र घाणीचे स्वरूप, दुर्गंधी पाण्यामुळे आरोग्य धोक्यात!

0
195

अकोला / १० एप्रिल २०२३

अकोट नगरपालीका मालकीचे दुकान भाडेपट्ट्यावर देऊन लाखो रुपयाची वसुली करणारा अकोट येथील आठवडी बाजार व दैनंदिन लाखो रुपयाची वसुली करूनही त्यामधून कुठल्याही पुरेपूर सुविधा उपलब्ध होत नाही.
दुकानदार व बाजारात येणाऱ्यां नागरिकांचे आरोग्य धोक्यात असल्याची चर्चा आहे.
नगरपालिका एवढी वसुली करून जिथून वसुली होते तेच सुविधा अभावी असल्याने त्यांच्या दुकाना समोरून नाल्या नसल्यामुळे गढूळ,दुर्गंधी साचलेले पाणी सरळ दुकानात घुसत आहे ..
दुकान मालक हा त्या पाण्यामधून ये जा करतो ..
रस्ता नसल्यामुळे पूर्ण रोडवर पाणी थांबल्याने दुर्गंधीचे वातावरण तयार झाले आहे…
.पण याकडे नगरपालिका व स्थानिक आमदार दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे.

आता WhatsApp वरमिळवाब्रेकिंगन्यूज, जॉबअपडेट्सआणिमहत्वपूर्णमाहिती! त्यासाठी क्लिककरा आणि जॉईनकरा. https://bit.ly/36S6BFu
आता झालेल्या अवकाळी पावसात पूर्ण गढूळ पाणी रोडवर पाणी थांबल्याने दुकानदार व सर्वसामान्य जनता दुर्गंधी पासून त्रस्त होत आहे.
पूर्ण पावसाळा भर सर्वांना त्रास सहन करावा लागला
व आता पावसाळा गेल्यानंतरही तेच हाल असल्याने दुकानदारांना त्रास सहन करावा लागत आहे.
त्याकरिता नगरपालिकेने याकडे लक्ष देण्याची गरज आहे
सर्व दुकानदार युनियन हे सोमवारी नगरपालिकेत मुख्याधिकारी यांना भेटून निवेदन देणार असल्याचे दुकानदारांनी प्रतिनिधी यांच्याशी बोलतांना सांगितले.

निवेदनामध्ये आम्ही एवढा कर भरतो व त्या बदलात नगरपालिका आम्हाला काय देते.

आता WhatsApp वरमिळवाब्रेकिंगन्यूज, जॉबअपडेट्सआणिमहत्वपूर्णमाहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/36S6BFu
सोयी सुविधा पासून वंचित असलेले दुकानदार व सर्वसामान्य जनता हे कुठपर्यंत त्रास सहन करणार आहे.एक दिवस असा येणार की दुकानदार व आठवडी बाजारात जाणारे ग्राहक हे न पा मुख्याधिकारी यांना बाजारात जायला रस्ता कुठे आहे याची विचारणा करणार ..
सर्व ग्रामीण भागातील मजूर व शेतकरी यांचे मोठे मार्केट कृषी सेवा केंद्र व आठवडी बाजार आहे ..

आता WhatsApp वरमिळवाब्रेकिंगन्यूज, जॉबअपडेट्सआणिमहत्वपूर्णमाहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईनकरा. https://bit.ly/36S6BFu
पण त्यांच्यासाठी या बाजारात त्यांना कुठल्याही सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या नाही.तर तीव्र आंदोलन करू असा इशारा यानिमित्ताने देण्यात आला ..
अशोक भाकरे, प्रतिनिधी अकोला,एम डी.टी.व्ही .न्युज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here