ALTRATECH:बेरोजगारांचा चक्का जाम,आश्वासनानंतर मागे ..

0
275

धुळे -२३/७/२३

शिंदखेडा तालुक्यातील वाघोदे येथील अल्ट्राटेक सिमेंट कंपनीमुळे पिकांचे, रस्त्याचे अतोनात नुकसान होत आहे. त्यातच कंपनी प्रशासनाने स्थानिकांना काम दिलेले नाही. त्यामुळे स्थानिकांचा रोष आहे. म्हणून गोराणे, माळीच , वाघोदा येथील शेतकरी , बेरोजगारांच्या वतीने गोराणे फाटा येथे दोन तास चक्का जाम आंदोलन करण्यात आले. प्रशासनाच्या वतीने शिंदखेडा नायब तहसीलदार कोळी यांनी आंदोलन कर्त्याचे निवेदन स्विकारले . शेती पीक नुकसानीची भरपाई व अन्य मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले. त्यांनंतर आंदोलन कर्त्यानी चक्का जाम आंदोलन मागे घेतले.हयावेळी पोलीस बंदोबस्तात आंदोलन चालू होते. दोन तास वाहतूक खोळंबली होती. गोराणे फाटा ते माळीच रस्त्यावर 60 टन क्षमतेची अवजड वाहतुक होत आहे. या रस्त्याची क्षमता 30 टन येवढी वाहतुकीचीच असल्याने सदर रस्त्याचा बोजवारा उडाला आहे. बाहेरील राज्यातील लोकांना दिलेला ठेका रद्द करण्यात यावा.स्थानिक बेरोजगारांना कंपनीत रोजगार व टेंडर देण्यात यावे.

WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

कंपनीमुळे होणारे वायु प्रदुषण थांबवावे. तसेच परिसरात वृक्षारोपण करावे.कंपनी परिसरात शेतीचे व पिकांचे जे नुकसान झाले आहे त्याची भरपाई मिळावी.आदी आंदोलन कर्त्याच्या मागण्या होत्या. गत चार महिन्यापासून या विविध प्रश्नांच्या संदर्भात कंपनी प्रशासनाकडे वेळोवेळी निवेदने, अर्ज , विनंती करण्यात आली. मात्र सपसेल हया गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष व टाळाटाळ करत असल्याने हे आंदोलन करण्यात आले. प्रशासनाच्या वतीने शिंदखेडा नायब तहसीलदार कोळी यांनी आंदोलन स्थळी भेट देत शिष्ठाई केली. आश्वासनानंतर सदरचे चक्का जाम आंदोलन मागे घेण्यात आले. हया आंदोलनाचे नेतृत्व दिनेश कदम यांनी केले होते. हयावेळी महेंद्र खैरनार, जिंतेद्रसिंग राजपूत, युवराज मोहिते , गौतम आखाडे , दिनेश कदम , विरेंद्र कदम, योगेश अहिरे या पदाधिकारी सह गोराणे माळीच वाघोदा येथील शेतकरी व बेरोजगार तरुणांचा सहभाग दिसुन आला. आश्वासनाची लवकर पुर्ती न झाल्यास पुढील आंदोलन तीव्र स्वरुपात राहील असा इशारा या निमित्ताने देण्यात आला.
यादवराव सावंत,शिंदखेडा प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज ,धुळे ..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here