BREAKING : खळबळ … पवारांनी मन वळवले … मी राजीनामा देणार ..

0
767

पुणे : ४/७/२३

आपण शरद पवार यांच्याकडे राजीनामा देणार असून माझा आतला आवाज सांगतोय की मी शरद पवार साहेबांसोबतच राहावं, असं अमोल कोल्हे म्हणाले.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पक्षात बंड करत शिंदे-भाजप सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी पक्षावर आपला दावा सुद्धा सांगितला आहे. अजित पवारांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादीत दोन गट पडले असून मोठी फूट पडली आहे. आपल्याकडे जास्त आमदारांचे पाठबळ असल्याचं अजित पवार सांगत आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) हे अजित पवार यांच्यासोबत शपथविधीवेळी दिसून आले होते. मात्र, आता त्यांनी आपली भू्मिका बदलली असून आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याचं सांगितलं आहे. इतकंच नाही तर आताचे सर्व राजकारण पाहता आपण आपला राजीनामा शरद पवार यांच्याकडे सादर करणार असल्याचंही ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा :

GOOD NEWS:कोंडलेल्या स्मारक चौकाचा श्वास अखेर झाला मोकळा..

Ajit Pawar बनले राज्याचे नवे उपमुख्यमंत्री …

 WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईनकरा. https://bit.ly/3UoK7E0

शिरूर लोकसभा मतदारसंघात मतदारांनी एका विचार धारेवर आणि माझ्यावर विश्वास ठेवून मतदान केले आहे. यामुळे मतदारांच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ नये म्हणून आपण शरद पवार यांच्याकडे राजीनामा देणार असून माझा आतला आवाज सांगतोय की मी शरद पवार साहेबांसोबतच राहावं, असं अमोल कोल्हे म्हणाले.
दरम्यान, मी मतदारांचा विश्वास तोडण्यासाठी राजकारणात आलेलो नाही. गेल्या चार वर्षांपासून मी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधितत्व करीत असून केंद्रात या मतदारसंघातील प्रश्नांबाबत अनेकदा प्रश्न उपस्थित केले आहेत. केंद्राच्या अनेक धोरणांवर मी विरोधी भूमिका घेतली आहे. मात्र आता अशी राजकीय परिस्थिती असताना मी कसा बदलू शकतो. असा प्रश्न मला सतावतो आहे. असेही कोल्हे म्हणाले.

एम डी टी व्ही न्यूज ब्युरो ,पुणे ..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here