… आणि भरउन्हात रस्त्यातच मातेने दिला बाळाला जन्म !

0
873
  • गरोदर मातेला घेऊन जाणारी रुग्णवाहिकांचा आजारी
  • हातोडा पुलावर पंचर रुग्णवाहिका स्टेफनी अभावी बंद
  • प्रसुत मातेसह नातेवाईकांना करावा लागला मनस्ताप

तळोदा :- “देव तारी त्यास कोण मारी” असं नेहमी म्हटलं जात. काळ गुरुवारी भरदुपारी एका मातेने रुग्णवाहिकेतच दिला बाळास जन्म दिला. नवजात शिशु व ग्रोगर मातांना आरोग्य सुविधा देण्याचा धिंदवडा पिटणाऱ्या आरोग्य यंत्रणेचे मात्र या घटनेने पूर्ण वाभाडे निघाले.

धडगाव तालुक्यातील शेंदवाने येथील महिलेला बिलगाव आरोग्य केंद्रावरून रुग्णवाहिकेतून नंदुरबार जिल्हा रुग्णालयात घेऊन जात असताना तळोदा पुढे हातोडा गावाजवळ मातेने बाळाला जन्म दिला. भर उन्हात दुपारी दोन वाजता प्रसुती झाल्यावर प्राथमिक उपचारासाठी जवळच असलेले उपजिल्हा रुग्णालयात दाखल न करता चालक रुग्णवाहिका नंदुरबारच्या दिशेने जात असताना काही अंतराने हातोडा पुलावर रुग्णवाहिका पंचर झाली. १०८ अत्यावश्यक सेवा तिथेच कोलमडली कारण पंचर झालेले चाक बदलण्यासाठी स्टेफनीच नव्हती.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

नंदुरबारहुन दुसरी रुग्णवाहिका आली त्यानंतर प्रसुती झालेली माता व बाळाला हलविण्यात आले. नंदुरबार येथील डॉ.अंजली अग्रवाल यांनी रुग्णवाहिकेत उपचार सुरु केला. या घटनेमुळे पुन्हा आरोग्य व्यवस्थापन वाऱ्यावर असल्याचे दिसुन आले.

दैव बलवत्तर म्हणून एका मातेचा व बाळाचा जीव वाचला. परंतु प्रसूती झालेल्या मातेला दवाखानाशिवाय पर्याय नसता तर… या विचाराने सोबतचे नातेवाईक चिंतीत होऊन संभ्रमित अवस्थेत आहेत. आरोग्य सेवा अत्यावश्यक सेवा आहे. ती गतिमान करण्यासाठी १०८ नंबरची रुग्णवाहिका मात्र मुर्दाड अवस्थेत असल्याचे दिसुन येत आहे. वाहनाचे टायरचे तार बाहेर दिसत होते. भरउन्हात असे टायर वापरणे जीवघेणे आहेत.

नितीन गरुड. एम.डी.टी.व्ही. न्युज, तळोदा ग्रामीण.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here