ट्रॅक्टर शोरुमवर कामावर असलेल्या प्रकाशा येथील तरुण तळोदा तालुक्यात ट्रॅक्टरची डिलेव्हरी देऊन घरी परतत असताना बुधावाल गावाजवळ एका अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीस धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. अपघातानंतर धडक देणारे वाहन घटनास्थावरून पसार झाले होते. एका विधवा मातेने कर्ता मुलगा या घटनेत गमावला होता. याबाबत तळोदा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद देखील करण्यात आली होती. कोणताही प्रत्यक्षदर्शी पुरावा नसताना अपघातग्रस्त वाहनांचे रस्त्यावर सापडलेल्या बंपरवरून पोलिसांनी ते वाहन शोधून काढत चक्क मध्यप्रदेशातून वाहन ताब्यात घेत चालकाला अटक केली आहे. पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक करण्यात येत असून मयत मुलाच्या आई व कुटुंबीयांनी पोलिसांचे आभार व्यक्त केले.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, प्रकाशा येथील रोहन हेमंत मुसळे हा तरुण ट्रॅक्टरची डिलिव्हरी सोमावल या गावी देऊन दुचाकीने ( क्रमांक एमएच ३९ – ३९०७ ) प्रकाशाकडे येत होता. बुधावल ( तालुका तळोदा ) या गावाजवळ देवमोगराकडे जाणारे एका चारचाकी वाहनाने समोरून येत असलेल्या रोहनच्या दुचाकीला धडक दिली. तो थेट दुचाकीवरून उधळला व ठोस देणाऱ्या वाहनाचा वरचा बाजूला कॅरीवर अडकून पडला. संबंधित वाहन चालकाने त्याला दवाखान्यात नेण्याऐवजी सुमारे २० किलोमीटर नेले व त्या ठिकाणी टाकून पळून गेला. कुटुंबियांना घटना कळताच त्यांनी रोहनचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणी पोलीस आले. त्यांना बंपर सापडला व त्याच्यावर कार्तिक हा शब्द लिहिला होता. त्यावर मिशी असलेले चिन्ह पोलिसांच्या हाती लागले. इथून १५ ते २० किलोमीटर अंतरावर रोहनचा मृतदेह सापडला होता.
ही घटना परिवारासाठी हृदयद्रावक होती. घरामध्ये विधवा आई, एक भाऊ आदित्य असा त्यांचा परिवार. घराचा कर्ता मुलगा अपघातात गेल्याने कुटुंबावर मोठे संकट आले. आईने हंबरडा फोडला. रोहनला न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणी आई व परिवाराने केली. परिवारासोबत त्यांचे मामा शरद वाणी यांनी नंदुरबार पोलीस अधीक्षक यांच्याकडे दाद मागितली. नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील व सहाय्यक पोलीस अधीक्षक निलेश तांबे, संभाजी सावंत यांनी तपासासाठी तीन पथक तयार केले. तळोदा येथील प्रभारी पोलीस निरीक्षक अमितकुमार बागल, पोहेकॉ.गौतम बोराळे, पोना.अजय पवार, विजय वसावे यांचे पथकाला पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत मार्गदर्शन केले.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
दरम्यान, घटनास्थळी वाहनांचे बंपर पडले होते. त्याच्यावर कार्तिक हा शब्द लिहला होता. एवढ्याशा दोनच गोष्टींवर पोलिसांनी चक्र फिरवली व संबंधित पथकाला अवघ्या चार दिवसात शोध लावण्याचा सूचना केल्या. तळोदा पोलिसांच्या पथकाने विनाविलंब कामाला लागले व काठावरील गुजरात, मध्यप्रदेश, महाराष्ट्र अशा तीनही राज्य पिंजून काढले. त्यानंतर सेलंबा येथून धागेदोरे हाती लागले. पोलीस पथक थेट खरगोन जिल्ह्यातील गडी या गावात पोहचले. याठिकाणी अपघातास कारणीभूत असलेली टेम्पोट्रॅक्स ( एमपी १० – बीए ४३३६ ) शोधून काढली. चालक आसाराम जमना बर्डे याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
चालक अपघात घडवून पळून गेला होता. गाडीचा कोणताही नंबर नसताना, अवघ्या कार्तिक आणि मिशी या चिन्हावरून ठिकठिकाणी सीसीटीव्ही फुटेज, तपासात गाडीचा शोध घेतला पोलिसांनी घेतला. ही गाडी देवमोगराला दर्शनासाठी जात होती. गाडी व गाडी चालक यांना पोलिसांनी सहा दिवसात शोधून आणले होते. कोणतेही ठोस पुरावे नसताना पोलिसांनी अपघातात मरण पावलेला रोहनला न्याय मिळवून दिला. यासाठी आज शनिवारी रोहनची आई मंगला मुसळे, मामा शरद वाणी, भाऊ आदित्य मुसळे, सुधाकर मराठे आदींनी नंदुरबार येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात जावून पोलीस प्रशासनाचा सन्मान केला. याप्रसंगी सुधाकर मराठे, पत्रकार नरेंद्र गुरव आदी उपस्थित होते.
जितेंद्र सूर्यवंशी. एम.डी.टी.व्ही. न्युज, प्रकाशा